Astrology l वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, न्यायदेवता शनी (Shani) लवकरच अस्त होणार आहेत. शनी सध्या कुंभ राशीत (Kumbh Rashi) विराजमान आहेत आणि 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत ते याच राशीत अस्त होणार आहेत. शनीच्या अस्ताचा परिणाम देश-विदेशावर होत असतो. काही राशींवर याचा शुभ, तर काहींवर अशुभ परिणाम होतो. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी होणाऱ्या अस्तामुळे अनेक राशींचे टेन्शन वाढणार आहे.
शनीच्या अस्ताचा परिणाम :
मेष राशीचा (Mesh Rashi) स्वामी मंगळ (Mangal) ग्रह आहे. या राशीच्या लोकांवर शनीच्या अस्ताचा परिणाम होईल. या काळात रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे, अन्यथा मानसिक तणाव वाढू शकतो.
शनीच्या अस्तामुळे तूळ राशीच्या (Tula Rashi) लोकांचा कठीण काळ सुरू होईल. या काळात पैशांचा जपून वापर करा, विनाकारण खर्च टाळा. कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिमा चांगली ठेवण्याचा प्रयत्न करा. नात्यात दुरावा येण्याची शक्यता आहे, त्यामुळे संवाद साधा.
Astrology l वृश्चिक आणि कुंभ राशीसाठी सूचना :
मंगळ ग्रहाची रास वृश्चिक (Vrushchik Rashi) आहे. शनीच्या अस्त काळात कोणत्याही प्रकारची पैशांची देवाणघेवाण करू नका. आरोग्याच्या बाबतीत सतर्क राहा. नात्यात गोडवा टिकवण्याचा प्रयत्न करा.
कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ आव्हानात्मक असेल. वाहन चालवताना काळजी घ्या. तुमचा व्यवसाय तुमच्या मेहनतीने पुढे जाईल, त्यामुळे इतरांवर अवलंबून राहू नका. या काळात बोलण्यावर नियंत्रण ठेवा, अन्यथा तुमच्या बोलण्यामुळे इतर दुखावले जाऊ शकतात.