बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भारतातील कोरोनाची परिस्थिती पाहावेना; सुंदर पिचाई यांनी उचललं मोठं पाऊल!

नवी दिल्ली | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातलं आहे. भारताला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसला असून राज्यांना आरोग्य सुविधांची कमतरता जाणवत आहे. व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, बेड्सचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे मायक्रोसॉफ्ट आणि गुगल या दोन कंपन्या भारताच्या मदतीसाठी पुढे सरसावल्या आहे.

मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला आणि गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी भारताला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी या संदर्भात ट्विट केलं आहे.

गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी भारताला वैद्यकीय मदत करण्यासाठी गुगलकडून 135 कोटींचा निधी पुरवाल जाईल, अशी घोषणा केली. गिव्ह इंडिया, युनिसेफ, स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून ही मदत पुरवली जाईल, असं सुंदर पिचाई यांनी स्पष्ट केलंय.

भारतामधील सध्याची परिस्थिती पाहून माझे हदय विदीर्ण झालं आहे. अमेरिकेने भारताला मदत करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मी आभारी आहे. कोरोनावरील उपचारांसाठी लागणारी आर्थिक मदत, वैद्यकीय उपकरणं आणि ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्सच्या खरेदासाठी मायक्रोसॉफ्ट आवाज उठवत राहील, असं सत्या नाडेल यांनी सांगितलं.

 

 

 

थोडक्यात बातम्या- 

#सकारात्मक बातमी | 105 वर्षीय आजोबा आणि 95 वर्षीय आजीची कोरोनावर मात

‘अँड द ऑस्कर गोज टू…’नोमडलँड’; सर्वोत्कृष्ट सिनेमाच्या पुरस्कारावर नाव कोरलं

“महाविकास आघाडी संकटाला संधी मानून राजकारण करत नाही”

‘या’ शहरात कोरोना मृतांच्या अंत्यसंस्कारासाठी महापालिकेकडून मिळणार ‘इतक्या’ रुपयांची मदत

18 ते 45 मधील फक्त याच नागरिकांना मिळणार अगोदर लस, अत्यंत महत्त्वाची माहिती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More