बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘डॉ. श्रीकांत जिचकर लिडर्स फेलोशीप’ कार्यक्रमाची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसकडून घोषणा

मुंबई | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्रीकांत जिचकर यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधत महाराष्ट्र प्रदेश युवक काँगेसतर्फे ‘श्रीकांत जिचकर लिडर्स फेलोशिप’ या योजनेची सुरवात होत असल्याची माहिती आज अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी दिली.

डॉ श्रीकांत जिचकर हे अष्टपैलू आणि कुशाग्र बुद्धिमत्तेचे व्यक्तिमत्त्व होते. विविध क्षेत्रांत त्यांनी लोकोपयोगी कामे केली असल्याने युवकांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने त्यांचे नाव या उपक्रमास दिले असल्याचे तांबे यांनी सांगितलं. युवकांना प्रशासकीय, शासकीय,व राजकीय कामांचा अनुभव यावा, त्यातून नवनवीन तरुण राजकारणात व प्रशासकीय कामात पुढे यावेत या उद्देशाने हा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून वयवर्षे 21 ते 30 या वयोगटातील युवक नोंदणी करू शकतात.

या फेलोशिप अंतर्गत काँग्रेसच्या मंत्र्यासोबत युवकांना सहा महिने काम करण्याची संधी मिळेल. पुढील ४ वर्षात एकूण 288 तरुण/तरुणींना फेलोशिप देण्याची योजना आहे. याची नोंदणी आजपासून सुरू होत असून महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सोशल मीडिया हँडल्सवर ऑनलाईन नोंदणीप्रक्रिये साठी लिंक उपलब्ध असुन हा नोंदणीप्रक्रियेची शेवटची तारीख 15 जुलै आहे. निवड झालेल्या उमेदवारांना 1 डिसेंबर पासून काम करण्याची संधी मिळेल.

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने सातत्याने नवनवीन तरुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देऊन त्यांच्यातील नेतृत्वगुणांना वाव देण्याचा प्रयत्न केला आहे. मागील दीड वर्षांत वेक अप महाराष्ट्र , सुपर 60, युवा जोडो अभियान अशा विविध कार्यक्रमातुन सामान्य कुटुंबातील युवकांना राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी युवक काँग्रेसने सातत्याने प्रयत्न केले आहेत. ह्याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून डॉ श्रीकांत जिचकर लीडर्स फेलोशिप कार्यक्रम जाहीर करत आहोत, असे सत्यजीत तांबे यांनी सांगितलं

ट्रेंडिंग बातम्या-

मनोज तिवारी यांना धक्का; भाजपच्या दिल्ली प्रदेशाध्यक्षपदावरुन उचलबांगडी

“नोकऱ्या गेल्या असतील, पगार कपात झाली असेल तर आम्हाला संपर्क साधा”

महत्वाच्या बातम्या-

संकटाच्या छाताडावर पाय ठेवून ते परतवून लावू- उद्धव ठाकरे

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पुढचे दोन दिवस घराबाहेर पडू नका- उद्धव ठाकरे

रायगडमधील ‘या’ समुद्र किनाऱ्यावर चक्री वादळाची शक्यता

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More