Loading...

“अर्धा महाराष्ट्र दुष्काळात असताना आणि अर्धा पुरात असताना मोदीजी आपण कुठं होता??”

मुंबई | काल सुपर संडे असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा, योगी आदित्यनाथ असे भाजपचे दिग्गज नेते महाराष्ट्रात प्रचाराला आले होते. मात्र अर्धा महाराष्ट्र दुष्काळात आणि अर्धा पुरात असताना मोदीजी आपण कुठं होता?? असा सवाल युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केला आहे.

पुरात लोकांचे व जनावरांचे बळी जात असतांना… अब्जो रुपयांचे नुकसान होत असतांना… मोदीजी आपण कुठे होता ?? मोदी स्वार्थी आहेत व फक्त मते मागायलाच येतात, अशी टीका तांबे यांनी केली आहे.

Loading...

नेटकऱ्यांना पंतप्रधान मोदींचं महाराष्ट्रात येणं आणि त्यांच्या प्रचाराचे मुद्दे काही भावलेले दिसत नाहीत. म्हणूनच नेटकऱ्यांनी #मोदी_परत_जा असा हॅशटॅग ट्वीटरवर सुरू केला होता. जवळपास 1 लाख लोकांनी मोदी परत जा…. अशा हॅशटॅग लावून ट्वीट केलंय.

दरम्यान, मोदी परत जा… महाराष्ट्रात मोदींना नो एन्ट्री… फक्त निवडणुकीपुरतंच महाराष्ट्रात येणाऱ्या मोदींचा निषेध अशा आशयाचे ट्वीट नेटकऱ्यांनी केले आहेत.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

 

Loading...

 

 

Loading...