बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“माणूस सत्तेवर असतांना जमिनीवर पाहिजे, सत्ता गेल्यावर तर सगळेच जमिनीवर येतात”

मुंबई | युवा काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. सत्ता गेल्यावर सगळेच जमिनीवर येतात, असं म्हणत सत्यजित तांबे यांनी फडणवीसांवर टीकास्त्र सोडलंय.

सत्यजित तांबे यांनी फडणवीस सरकारमधील नेत्यांचे विमानातून पूरस्थितीची पहाणी करतानाचे फोटो तसेच ठाकरे सरकारमधील नेत्यांचे प्रत्यक्ष जमिनीवरुन पूरस्थितीची पहाणी करतानाचे फोटो शेअर करत भाजपवर टीका केलीये.

दरम्यान, माणूस सत्तेवर असतांना जमिनीवर पाहिजे. सत्ता गेल्यावर तर सगळेच जमिनीवर येतात, असं सत्यजित तांबे म्हणालेत.

 

महत्वाच्या बातम्या-

“बिहारमध्ये प्रचार करण्यापेक्षा स्वत:च्या राज्यासाठी आधी काम करा”

घोषणा देणारे गेले, आम्ही प्रत्यक्षात मदत करू- उद्धव ठाकरे

पुढच्या 24 तासात धुवांधार पाऊस होईल; हवामान खात्याकडून ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

अतिवृष्टीमुळे गावाचा प्रमुख रस्ता वाहून गेला; चिखल-गाळ तुडवत फडणवीस नुकसानग्रस्तांच्या भेटीला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More