बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“श्रीराम बोले मै कहाँ बडा, मै तो बीजेपी के मॅनिफेस्टो मे पडा”

मुंबई | राम मंदीर उभारणीसाठी निधी जमवण्यावरून सध्या राजकीय पक्षांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. काँग्रेस नेते सत्यजित तांबे यांनीही एक व्हिडीओ ट्वीट करून भाजपवर शरसंधान साधलं आहे. दरम्यान, त्यांनी ट्वीट केलेल्या व्हिडीओमध्ये एक भाजपविरोधी नेता भाजपच्या ठायी श्रीराम काय आहेत ते सांगत आहे.

संबंधित व्हिडिओमध्ये संबंधित नेता देव-देवतांची एक गोष्ट सांगतो. त्यानुसार सर्व देवतांमध्ये श्रेष्ठ कोण? हे जाणून घेण्याचा प्रयत्न सर्व देव करत असतात आणि ते सर्वजण आधी गंगा नदीच्या तिरी जातात त्यानंतर ते शंकराकडे जातात आणि नंतर ते पर्वताकडे जातात. पर्वताकडुन ते सर्व बजरंगबली हनुमानाकडे जातात आणि सर्वात शेवटी अखेर ते सर्वजण श्रीरामाकडे येतात.

श्रीरामाकडे आल्यानंतर ते स्वत: सर्वांना सांगतात मी तर भाजपच्या जाहीरनाम्यातच असतो. त्यामुळे मी कसा मोठा? जेव्हा निवडणूक आली तेव्हा फक्त मला बाहेर काढलं जातं आणि निवडणूक संपली की पुन्हा आपल्या जागेवर. अशाप्रकारे या व्हिडिओमध्ये तो नेता भाजपवर टीका करताना दिसुन येत आहे.

काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही यापुर्वी भाजपच्या निधी संकलनावरून त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. दरम्यान सत्यजित तांबे यांनी शेअर केलेल्या व्हिडिओने नविन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

पाहा व्हिडिओ –

थोडक्यात बातम्या- 

कुख्यात गुंड गजा मारणेविरोधात पोलिसांनी केली ‘ही’ मोठी कारवाई

‘…तर पेट्रोल आणि डिझेल होऊ शकतं स्वस्त’; SBI च्या अर्थतज्ज्ञांनी सुचवला ‘हा’ पर्याय

अजित पवारांनी फडणवीसांना दिलेला ‘तो’ शब्द खरा करून दाखवला

वडिलांना ‘टकला’ म्हणणं मुलीला पडलं महागात; सावत्र बापाने केलं ‘हे’ धक्कादायक कृत्य

पोलीस असल्याचं सांगून ठेवले शारीरिक संबंध, चौकशी केल्यावर समोर आला धक्कादायक प्रकार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More