…आणि युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजित तांबेंनी मोदींच्या पोस्टरला काळं फासलं!

मुंबई | ‘मोदी तेरा अजब खेल, सस्ती दारु मैहंगा तेल…’ असं म्हणत युवक काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी मोदींच्या पोस्टरला काळं फासलं. ‘नरेंद्र मोदी मुर्दाबाद’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

इंधनाच्या किमतींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. याविरोधात राज्यभरात युवक काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आलं.

आंदोलनाचं नेतृत्व स्वतः सत्यजित तांबे यांनी केलं. पेट्रोल डिझेलच्या किंमतीवर जीएसटी लागू करा, दुष्काळ-दारुबंदीच्या नावाखाली जे उपकर लावले आहेत ते कमी झाले पाहिेजे, अशी मागणी सत्यजित तांबे यांनी यावेळी केली. 

महत्त्वाच्या बातम्या-

-#MeToo | …तर मी महिलांच्या पाठिंशी खंबीरपणे उभा असेन- अमिताभ बच्चन

-#MeToo | ‘या’ प्रसिद्ध कर्णधारावर एअर होस्टेसचा विनयभंगाचा आरोप

-बाळासाहेब असते तर कमळाबाईसोबतचे संबंध कधीच तोडले असते!

-मी लोकसभेची निवडणूक लढवणार नाही!

-#MeToo | सलमान खानने माझा मानसिक छळ केला!