“विखेंनी राजकारणाची घाणेरडी पातळी गाठली, नीच लोकांना त्यांची जागा..”; सत्यजित तांबे संतापले

Satyajeet Tambe tweet on sujay vikhe 

Satyajeet Tambe | भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या युवा संकल्प मेळाव्यात भाजप नेते वसंतराव देशमुख यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्याबद्दल खालच्या पातळीवर टीका केली आहे. यामुळे संगमनेरमध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. कॉँग्रेसकडून येथे रात्रभर ठिय्या आंदोलन करण्यात आलं. तसेच, शहरात वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ देखील करण्यात आली. सुजय विखे यांच्यासमोरच भाजप नेत्याने टीका केल्याने त्यांनाही आता कॉँग्रेसकडून टार्गेट करण्यात येत आहे. याच प्रकरणी आता नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe)यांनीही संताप व्यक्त केलाय.

सुजय विखे यांनी संगमनेरच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने राजकारणाची घाणेरडी पातळी गाठली आहे, असा संताप सत्यजित तांबे यांनी ट्वीटद्वारे व्यक्त केलाय. सुजय विखे यांच्या उपस्थितीत त्यांचे सर्वात जुने, सगळ्यात जवळचे व तालुक्यातील सगळ्यात मुर्ख म्हणून ओळखले जाणारे वसंत देशमुख यांनी आमची बहिण डॉ. जयश्री थोरात हिच्यावर टीका करताना जी पातळी सोडली, ती त्यांची खरी संस्कृती आहे, अशी टीका सत्यजित तांबे यांनी केली.

सत्यजित तांबे यांचं ट्वीट चर्चेत

“ह्याच वसंत देशमुखला आमचे आजोबा स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब थोरात यांनी चांगलाच सरळ केला होता. आता परत वेळ आली आहे, अशी नीच लोकांना त्यांची जागा दाखवण्याची. बाकी सविस्तर मी लवकरच बोलेलच.”, असं ट्वीट सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी केलंय.

संगमनेर मतदारसंघातील धांदरफळ येथे आयोजीत युवा संकल्प सभेत भाजप नेते वसंतराव देशमुख यांनी आपल्या भाषणात जयश्री थोरात यांच्यावर खालच्या पातळीवर टिका केली. त्यानंतर शहरातील वातावरण चांगलंच पेटलं. टीका करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून अटक करावी या मागणीसाठी रात्री उशिरा पोलीस ठाण्यासमोर जयश्री थोरात आणि दुर्गाताई तांबे यांच्यासह शेकडो थोरात समर्थकांनी ठिय्या आंदोलन केलं.

या घटनेनंतर सुजय विखे यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. मी त्यांना ताई म्हणून संबोधलं, त्यामुळे महिलांचा सन्मान व्हायलाच हवा असं सुजय विखेंनी म्हटलंय. तसेच, आमच्या गाड्या ज्यांनी जाळल्या त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी देखील विखे पाटील यांनी केली.

नेमकं प्रकरण काय?

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ गावात काल 25 ऑक्टोबररोजी सुजय विखे यांची सभा झाली. या सभेत बाळासाहेब थोरात यांच्या मुलीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आलं. “तुमच्या कन्येला समजवा, नाहीतर आम्ही निवडणुकीच्या काळात मैदानात उतरलो, तर तुमची मुलगी घराबाहेर पडणार नाही. सुजय विखे पाटील, त्यांना ताई म्हणातात. पण सुजयदादा या ताईचे पराक्रम सगळ्या तालुक्याला माहिती आहे.”, असं वक्तव्य भाजप नेते वसंतराव देशमुख यांनी केलं. यानंतर कॉँग्रेसकडून याचा तीव्र विरोध करण्यात आला. देशमुख यांच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. (Satyajeet Tambe)

News Title –  Satyajeet Tambe tweet on sujay vikhe 

महत्त्वाच्या बातम्या-

ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर; भाजप-शिंदे गटाविरोधात दिले ‘हे’ तगडे उमेदवार

जयश्री थोरातांवर भाजप नेत्याची खालच्या पातळीवर टीका; संगमनेरमध्ये राजकारण पेटलं

आज मेष, वृषभसह ‘या’ राशीवर राहील शनीदेवाची कृपा!

महायुतीचा मोठा डाव! आदित्य ठाकरें विरुद्ध उतरवला ‘हा’ बडा नेता

शरद पवारांनी मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न चिघळवला, ‘या’ नेत्याचं टीकास्त्र

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .