सप्तखंजिरीवादक सत्यपाल महाराजांवर मुंबईत चाकूहल्ला

सत्यपाल महाराज

मुंबई | सप्तखंजिरीवादक आणि कीर्तनकार सत्यपाल महाराज यांच्यावर चाकूहल्ला करण्यात आलाय. पोलिसांनी याप्रकरणी एका माथेफिरुला अटक केलीय. दादरच्या नायगावमध्ये शुक्रवारी ही घटना घडली. 

नायगावमध्ये बौद्ध जयंतीनिमित्त महाराजांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंचावर फोटो काढण्यास आलेल्या एकाने महाराजांच्या मानेला दाबून पोटात चाकूने वार केले. या हल्ल्यात जखमी झालेल्या सत्यपाल महाराजांवर सध्या केईएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या