त्यांचे पूर्वज माकड असतील, आमचे नाहीत- सत्यपाल सिंग

औरंगाबाद | जे शिक्षक आपले पूर्वज माकड आहेत असं शिकवतात त्यांचेच पूर्वज माकड असतील, आमचे पूर्वज माकड नाहीत, असं केंद्रीय मंत्री सत्यपाल सिंग यांनी म्हटलंय. ते औरंगाबादमध्ये आयोजित भारतीय वैदिक संमेलनात बोलत होते.

माकड माणसाचे पूर्वज आहेत असं वेद शास्त्रात कुठंही म्हटलेलं नाही. त्यामुळे आम्ही आहोत तसेच होतो, असं म्हणत त्यांनी डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत नाकारला. 

जी माणसं इतिहास शोधतात ते आपल्या परंपरेला खाली आणतात. माकडे माणसाचे पूर्वज आहेत असले धडे पाठ्यपुस्तकातून वगळायला हवेत, असंही त्यांनी म्हटलंय.