मामा-भाचे काँग्रेसला तारणार का???

मुंबई | महाराष्ट्र काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती करण्यात आली. बाळासाहेबांचे भाचे सत्यजीत तांबे हे महाराष्ट्र युवक काँग्रेसते प्रदेशाध्यक्ष आहेत. महाराष्ट्र काँग्रेसची धुरा आता मामा-भाच्याच्या हाती आली आहे.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाची चांगलीच वाताहत झाली. त्यानंतर राज्यातील नेतृत्व बदललं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन ही निवड करण्यात आल्याचं दिसून येतंय.

राज्यातील प्रदेशाध्यक्ष पदासाठी आणखी काही नेत्यांची नावही चर्चेत होती मात्र अखेर बाळासाहेब थोरात यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडली आहे.

दरम्यान, आता आगामी निवडणूकीत ही मामा भाच्याची जोडी मरगळलेल्या काँग्रेस पक्षाला उभारी देणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-शिवसेनेच्या बॅनरवर आता फक्त ठाकरे…

-बिग बॉसच्या घरात शिवानी सुर्वेची पुन्हा एंट्री, पण बिग बॉसने घातली ‘ही’ अट

-कोरेगाव भिमा प्रकरणातील खटले मागे घ्या; रिपब्लिकनच्या आठवले गटाची मागणी

-शेतकऱ्यांसाठी मोर्चा ही शिवसेनेची फक्त नौटंकी- विजय वडेट्टीवार

-असले चिछोरे चाळे करणे बंद करा; पंकजा मुंडे यांचा धनंजय यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा

Loading...