बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आयपीएल स्पर्धा रद्द होणार का?; सौरव गांगुली म्हणतो…

मुंबई | आयपीएल स्पर्धा लांबल्यामुळे क्रिकेटप्रेमींच्या पदरी निराशा पडली. बीसीसीआयने आयपीएल स्पर्धा 15 एप्रिलपर्यंत लांबणीवर टाकलेली आहे. त्यात 15 एप्रिलला तरी ही स्पर्धा होणार की नाही हे तळ्यात मळ्यात आहे. यावर बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीने यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

येत्या काही दिवसांत काय घडामोडी घडतायत त्यावरुन स्पर्धेचं भवितव्य ठरणार आहे. त्यामुळे आता काही बोलणं योग्य ठरणार नसल्याचं सौरव गांगुलीने म्हटलं आहे.

आमच्याकडे सध्याच्या घडीला स्पर्धा पुढे ढकलणं हा एकमेव पर्याय योग्य होता. कारण खेळाडूंचं सुरक्षित राहणं हे सर्वात महत्वाचं आहे. त्यामुळे आम्ही स्पर्धा पुढे ढकलली असल्याचं सौरव गांगुलीने सांगितलं आहे.

दरम्यान, बीसीसीआयने भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातली वन-डे मालिकाही रद्द केली आहे. पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर, बीसीसीआयने हा निर्णय घेतला. आगामी काळात ही मालिका पुन्हा खेळवली जाणार असल्याची माहिती आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

“मुख्यमंत्र्यांच्या पाठीचा कणा शाबूत असेल तर त्यांनी नितीन राऊतांच्या विरोधात कारवाई करून दाखवावी”

अलिबागजवळ 78 प्रवाशांना नेणारी बोट समुद्रात उलटली!

महत्वाच्या बातम्या-

अलिबागजवळ 78 प्रवाशांना नेणारी बोट समुद्रात उलटली!

राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सातही जागा बिनविरोध, अधिकृत घोषणा 18 रोजी

कौतुकास्पद! वडिलांसोबत दुकानात काम करत शुभम गुप्ता झाला IAS

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More