भारतीयांसाठी खूशखबर!!!, सौरभ नेत्रवलकर भारतात येऊन T20 वर्ल्डकप खेळणार

Saurabh Netravalkar। आयसीसी टी 20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेतील यूएसए विरूद्ध आयर्लंड यांच्यातील 30 वा सामना हा पावसामुळे  रद्द करण्यात आला. सामना रद्द झाल्याने दोन्ही संघांना एकसमान 1-1 गुण देण्यात आले. यूएसएचे एकूण 5 गुण झाले आहेत. यूएसएने सुपर 8 मध्ये प्रवेश केला. सुपर 8 मध्ये प्रवेश  करणारे टीम इंडिया आणि यूएसए हे दोन संघ आहेत.

तसेच पाकिस्तान, आयर्लंड आणि कॅनडा हे तीन संघ स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. यूएसए नवव्या टी 20 वर्ल्डकप स्पर्धेत सुपर 8 मध्ये एंट्री घेताच आनंदाची बातमी समोर आली आहे. अमेरिकेने 2026 साली होणाऱ्या आयसीसी टी 20 वर्ल्ड कपमध्ये थेट प्रवेश मिळवला आहे. टी 20 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतही एकून 20 संघ खेळणार आहेत.

आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2026 मध्ये थेट प्रवेश मिळवणाऱ्या संघांमध्ये ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, इंडिया, दक्षिण आफ्रिका आणि यूएसए या सहा संघांचा यामध्ये समावेश झाला आहे. तर आता इंग्लंड आणि बांग्लादेशही सुपर 8 मध्ये पोहोचताच आपली जागा निश्चित करतील. इंग्लंड आणि बांग्लादेशची संधी हुकली तर नेदर्लंड आणि स्कॉटलँडला थेट संधी मिळाली आहे. अशा प्रकारे आठ संघ निश्चित होतील.

सौरभ नेत्रवाळकर मायदेशात खेळणार

दरम्यान आता सौरभ नेत्रवाळकर (Saurabh Netravalkar) हा एक मुंबईकर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मराठी खेळाडू यूएसएमध्ये आपली नोकरी सांभाळून क्रिकेट खेळतो. त्याचं वय हे सध्या 32 आहे. जर सौरभने (Saurabh Netravalkar) येत्या दोन वर्षांमध्ये (2026) वर्षांपर्यंत निवृत्ती घेतली नाहीतर तो आपल्या मायदेशात (भारतात) खेळताना दिसणार आहे. (Saurabh Netravalkar)

यूएसए टीम

ओरान जोन्स (कॅप्टन), शायन जहांगीर, स्टीव्हन टेलर, अँड्रिज गॉस (विकेटीकीपर), नितीश कुमार, कोरी अँडर्सन, हरमीत सिंह, शेडली व्हॅन शाल्कविक, जसदीप सिंह, सौरभ नेत्रवाळकर (Saurabh Netravalkar), अली खान, नॉथुश केंजिगे, मोनांक पटेल, निसर्ग पटेल आणि मिलिंद कुमार.

News Title – Saurabh Netravalkar T20 World 2026 Marathi News

महत्त्वाच्या बातम्या

“नाद फक्त तुमचाच”, अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा ‘तो’ व्हिडिओ तूफान व्हायरल

मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघात मोठा ट्विस्ट, मतमोजणीबाबत ठाकरे गटाचा गंभीर आरोप

‘सामे’ गाण्यावर सोनालीने लगावले ठुमके; दिलखेचक अदांपुढे सारेच घायाळ, पाहा Video

“देवेंद्र फडणवीसांनी सोलापूरात दंगली घडवण्याचा प्रयत्न केला”; कॉँग्रेसच्या आरोपांनी राज्यभर खळबळ

“झुंडमे कुत्ते आते है.. शेर अकेला आता आहे”; शिंदे गटाच्या बॅनरबाजीनंतर राणेंच्या बॅनरने वेधलं लक्ष