खेळ

महिला क्रिकेटपटूंसाठी IPL ची घोषणा लवकरच करणार- सौरव गांगुली

नवी दिल्ली | पुरुषांप्रमाणे महिलांची आयपीएल खेळवण्यात यावी याबाबत मागणी केली जात होती. अखेर यावर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी मौन सोडलं आहे. महिला क्रिकेट खेळाडूंसाठीही लवकरच आयपीएलची घोषणा होणार असल्याचं बीसीसीसाय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी सांगितलं आहे.

याविषयी बोलताना गांगुली म्हणाला, “मी एक गोष्ट तुम्हाला नक्की सांगू शकतो की महिलांसाठी आयपीएलवरही आमचा विचार सुरु आहे. भारतीय महिला संघासाठीही आम्ही काही प्लान आखले आहेत. हे सर्व झाल्यानंतर याची घोषणा करण्यात येईल.”

आयसीसीने टी-20 वर्ल्डकप पुढे ढकलल्यामुळे आयपीएलचा मार्ग मोकळा झाला असून युएईमध्ये आयपीएल खेळवण्यात येणार आहे. सध्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपलेला सौरव गांगुली सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची वाट पाहत आहे. या कारणासाठी गांगुलीने याबद्दल अधिक माहिती देण्यास नकार दिला. पण बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 1 ते 10 नोव्हेंबरदरम्यान महिला खेळाडूंसाठी चॅलेंजर सिरीजचं आयोजन केलं जाऊ शकतं.

सध्या बीसीसीआयद्वारे भारतीय महिला संघासाठी दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज या दोन संघांसोबत मर्यादीत ओव्हरची मालिका आयोजित करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे येत्या काळात बीसीसीआय महिला आयपीएलबद्दल काय घोषणा करतं याकडे सर्वांचं लक्ष आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘…म्हणून मी सुशांतच्या अंत्यविधीला गेले नाही’; अंकिता लोखंडेने सोडलं मौन

अभिनेता आफताब शिवदासानी झाला ‘बाप’माणूस!

मी कृषीमंत्री होतो त्यावेळी शेतकऱ्यांवर…, एकनाथ खडसेंचा ठाकरे सरकारवर प्रहार!

अक्षय कुमारने नाशिकपाठोपाठ मुंबई पोलिसांनाही केली मदत

बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांचा सुशांतसिंग प्रकरणावरून उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या