सौरव गांगुलीचा गौतम गंभीरला विरोध?; सौरव गांगुलीच्या पोस्टने खळबळ

Saurav Ganguly | टी 20 वर्ल्डकप स्पर्धेनंतर टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा प्रशिक्षण पदाचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे आता खूप आधीच बीसीसीआयने टीम इंडियाचा आगामी प्रशिक्षक शोधण्यास सुरूवात केली आहे. नुकताच आयपीएलचा थरार पाहायला मिळाला.

यंदाच्या आयपीएल 2024 वर्षात कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएलचं जेतेपद पटकावलं आहे. केकेआरचा प्रशिक्षक हा गौतम गंभीर होता. यामुळे आता गौतम गंभीर हा टीम इंडियाचा प्रशिक्षक होऊ शकतो अशी चर्चा आहे. मात्र अशातच सौरव गांगुलीने (Saurav Ganguly) केलेल्या एका ट्विटने अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

गौतम गंभीरच्या कर्णधार पदाची धुरा सांभाळण्याबाबत अनेक चर्चा आहेत. यामध्ये बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुलीने एक ट्विट केलं आहे. गौतम गंभीरच्या नावाला सौरव गांगुलीचा (Saurav Ganguly) विरोध असल्याचं नेटकऱ्याचं म्हणणं आहे. यामुळे आता सौरव गांगुलीच्या (Saurav Ganguly) मनात नेमकं काय चाललं आहे याबाबत चर्चांना उधाण आलंय.

सौरव गांगुलीचं ट्विट

माणसाच्या आयुष्यात प्रशिक्षण हे फार महत्त्वाचे आहे. प्रशिक्षण मैदानाबाहेर आणि मैदानात आपल्या मार्गदर्शनाने आणि प्रशिक्षणाने कोणत्याही व्यक्तीचे भविष्य सुधारतो. त्यामुळे संस्थेची आणि प्रशिक्षकाची निवड अगदी हुशारीने करावी, अशी पोस्ट सौरव गांगुलीने (Saurav Ganguly) केली आहे.

दरम्यान क्रिकेटपटू म्हणून गंभीरने भारताला दोनवेळा जेतेपद मिळवून दिलं आहे. 2007 ला पहिल्यांदा टी 20 आणि त्यानंतर 2011 मध्ये वनडे वर्ल्डकप स्पर्धेतही त्याने चांगली खेळी केली होती.  नव्या प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ हा साडे तीन वर्षांचा आहे. यातही टी 20 वर्ल्डकप, टेस्ट चॅम्पियनशिप आणि चॅम्पियन ट्रॉफीचा समावेश आहे.

आता यावेळी टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी कोण विराजमान होतं? हे पाहणं गरजेचं आहे. गंभीरच्या प्रशिक्षण पदावर नेमकं काय होईल गंभीरला टीम इंडियाचं प्रशिक्षक पद दिलं जाईल की नाही. हे पाहणं गरजेचं असेल. हे लवकरच समजेल.

दरम्यान, यंदाच्या आयपीएल 2024 मध्ये केकेआरने जेतेपद मिळवलं. या संघाचा कर्णधार हा श्रेयश अय्यर होता. तर या संघाचा प्रशिक्षक हा गौतम गंभीर होता. त्यामुळे आता गंभीरला टीम इंडियाचं कर्णधार पद मिळेल अशा चर्चा आहेत. मात्र अद्यापही यावर कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.

News Title – Saurav Ganguly Tweet Between Gautam Gambhir Will Next Team India Coach

महत्त्वाच्या बातम्या

अडचणीत सापडलेल्या आव्हाडांची छगन भुजबळांकडून पाठराखण, म्हणाले…

बाप, आज्यानंतर आता आईही अडचणीत; आईच्या रक्ताची चाचणी होणार

‘गप्प घरी बसून संन्यास घ्यायचा’; अजित पवारांचं अंजली दमानियांना उत्तर

गौतमी पाटीलमुळे लावणी भ्रष्ट झाली, लावणीला डाग लागला- डॉ. चंदनशिवे

मान्सून वेळेआधीच केरळमध्ये दाखल, हवामान विभागाने दिली मोठी अपडेट