Top News महाराष्ट्र मुंबई

”सावरकरांचा पुळका’ असल्याचं दाखवणारे त्यांना भारतरत्न का देत नाहीत?’; राऊतांचा भाजपला सवाल

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दसऱ्या मेळाव्यात केलेल्या भाषणात विरोधकांवर जोरदार टीकेचे बाण सोडले. तर भाजपनेही मुख्यमंत्र्यांच्या भाषणावरून शिवसेनेवर टीका केली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या टीकेला प्रत्युत्तर देत भाजपला काही सवाल केले आहेत.

सावरकर सभागृहात भाषण करताना मुख्यमंत्री सावरकरांबद्दल एकही शब्द का बोलले नाहीत. त्यांना त्यांच्या मित्र पक्षाची भिती असावी, अशी टीका भाजपकडून करण्यात आली. यावर राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

दरम्यान, गेल्या 6 वर्षात अनेकांना भारतरत्न देण्यात आले. मग सावरकरांना भारतरत्न का दिला नाही, यामध्ये कोणत्या अडणची येत आहेत, असा सवाल राऊतांनी भाजपला केला आहे.

दरम्यान,  स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अपमानावर शिवसेना गप्प बसलेली नाही आणि कधीही गप्प बसणार नाही. त्यासाठी वाटलं तर इतिहास चाळून पहा. सावरकर शिवसेनेचे मार्गदर्शक आणि आदर्श आहेत, असं राऊत यांनी म्हटलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

…यांना महाराष्ट्राचा ठेकेदार कुणी बनवलं?- कंगणा राणावत

“एका दिवसासाठी विसरा तुम्ही मुख्यमंत्री आहात आणि होऊन जाऊ दे एकदा”

“उद्धव ठाकरेंना सर्व आयतं मिळालं आहे… सरकार पडणार असून हे शरद पवारांनाही माहीत आहे”

‘…तर उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागेल’; दिशा सालियान प्रकरणाचा धागा पकडत राणेंची मुख्यमंत्र्यांवर गंभीर टीका

फडणवीसांची मुख्यमंत्र्यांना 100 पत्र; मात्र उद्धव ठाकरेंकडून एकाचंही उत्तर नाही!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या