बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सावरकरांचा गौरव प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळला

मुंबई | भाजपने विधानसभेत सावरकरांचा गौरव प्रस्ताव आणला होता. मात्र, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सावरकरांचा गौरव प्रस्ताव फेटाळला आहे. त्यानंतर विधानसभेत भाजपने गोंधळ घालत जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे सावरकरांच्या मुद्द्यावरुन भाजप चांगलाच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.

भाजपने सभागृहात फलक दाखवत विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेचा विरोध केला. तसेच विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे सभागृहात चांगलाच गदारोळ पाहायला मिळाला. महाविकास आघाडी सरकारने सावरकरांचा गौरव प्रस्ताव स्वीकारावा अशी मागणी भाजपनं केली होती.

कामकाज सल्लागार समीतीच्या बैठकीत सावरकरांचा गौरव प्रस्ताव आणण्याचा भाजपने आग्रह केला होता. मात्र, सत्ताधारी पक्षांनी याला विरोध केल्याने भाजपने टीका केली.

दरम्यान, शिवसेनेनं प्रस्ताव मान्य करावा अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. यावर अगोदर सावरकरांना भारतरत्न द्या, त्यानंतर गौरव प्रस्ताव स्वीकारु, असं शिवसेना नेते अनिल परब यांनी प्रत्युत्तर दिलं.

ट्रेंडिंग बातम्या-

मराठा आंदोलक विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी सभागृहात आक्रमक भूमिका मांडणार- फडणवीस

11 नाही तर 15 दिवसांत ठाकरे सरकार पडेल- रामदास आठवले

महत्वाच्या बातम्या-

तुकाराम मुंडेंची धडक कारवाई; कुख्यात गुंडाच्या आलिशान बंगल्यावर हातोडा

दिल्लीतील हिंसाचारामुळे सीबीएसईच्या परीक्षा पुढे ढकलल्या

सावरकरांचं योगदान विसरुन चालणार नाही- अजित पवार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More