राहुल गांधींविरोधात सावरकर कुटुंबियांची पोलिसांत धाव!

मुंबई | काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींविरोधात सावरकर कुटुंबियांनी पोलिसात धाव घेतली आहे. रणजीत सावकर यांनी यासंदर्भात पोलिसांना अर्ज केला आहे. 

छत्तीसगडमधील जगदलपूरमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी सभा घेतली होती. पंतप्रधान मोदींनी काँग्रेसला देशभक्ती शिकवू नये, असं राहुल यांनी या सभेत म्हटलं होतं. 

काँग्रेसचे नेते इंग्रजांशी लढत असताना सावरकर इंग्रजांची हात जोडून प्रार्थना करत होते, असं वक्तव्य देखील त्यांनी केलं होतं. या वक्तव्यावर सावकर कुटुंबियांनी आक्षेप घेतला आहे.

पोलिसांनी राहुल गांधींविरोधात एफआयआर दाखल करावा, अन्यथा न्यायालयात फौजदारी कारवाईसाठी अर्ज केला जाईल, रणजीत सावरकर यांनी स्पष्ट केलंय.

महत्त्वाच्या बातम्या-

-मुनगंटीवारांचं वनमंत्रीपद काढून घ्या; मनेका गांधींचं मुख्यमंत्र्यांना पत्र

-नेस्ले इंडियाची मोठी घोषणा; आता मॅगीचं पाकीट चक्क फुकट मिळणार!

-भाजपसाठी धोक्याची घंटा; लोकसभेतील जादूई आकडा गमावला

-दगाफटका झाल्यास रस्त्यावर उतरु; मराठा समाजाचा इशारा

-…म्हणून रोहितला कसोटी सामन्यात न खेळवण्याचा बीसीसीआयचा निर्णय