पुणे महाराष्ट्र

‘सविता भाभी…तू इथंच थांब’ होर्डींग्सचं कोडं उलगडलं

पुणे | पुण्यातील काही भागात ‘सविता भाभी…तू इथंच थांब’, असे होर्डींग्स लावण्यात आले होते. यावरुन सगळेच जण बुचकळ्यात पडले होते. हे होर्डींग्स का लावण्यात आले याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. अखेर या मागचं खरं कारण समोर आलं आहे.

‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ नावाचा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हे होर्डींग्स पुण्यातील अनेक ठिकाणी लावण्यात आले होते. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.

प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये, हॅलो मी सविता… तुझी सविता… तुम्हाला माहित असलेली पण तुम्ही कधीही न पाहिलेली, अशा प्रकारचा संवाद आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी होर्डींग्स लावण्याची युक्ती लढवण्यात आल्याचं स्पष्ट होत आहे.

दरम्यान,  गेल्या काही दिवसांपासून पुणे शहर पोस्टरबाजीमुळे प्रसिद्धीस येत आहे. काही दिवसांपूर्वी ‘शिवडे… आय एम सॉरी’ असे पोस्टर पिंपरीत सगळीकडे झळकले होते.

 

 

View this post on Instagram

 

अख्खं शहर वाट बघतंय तुझी! #SoundOn #AUMM #6March #HandiFutnar

A post shared by parna 🌿 (@parnapeace) on

ट्रेंडिंग बातम्या-

मुख्यमंत्र्यांचा मुलगा स्वखर्चाने उभारणार शिवाजी महाराजांचा पुतळा

पवारांवर पीएचडी करणं ये आपके बस का काम नही है- रूपाली चाकणकर

महत्वाच्या बातम्या-

मासिक पाळी नसल्याचे सिद्ध करण्यासाठी 68 विद्यार्थिनींना केले नग्न!

राजकारणातील खरे चाणक्य तुम्ही की शरद पवार? अमित शहा म्हणाले…

औरंगाबादचं नाव ‘संभाजीनगर’करून मुख्यमंत्री सरप्राईज देणार- चंद्रकांत खैरे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या