बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रानडे इन्स्टिट्यूटच्या विलीनीकरणाला माजी विद्यार्थ्यांचा जोरदार विरोध

पुणे | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा संज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या विभाग अर्थात रानडे इन्स्टिट्यू़टच्या स्थलांतर तसेच विलीनीकरणाच्या मुद्द्यावरुन माजी विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. यासाठी रानडे बचाव कृती समितीची स्थापना करण्यात आली असून विभागाच्या स्थलांतरास तसेच विलीनीकरणास जोरदार विरोध केला आहे.

रानडे इन्स्टिट्यूट हा विद्यापीठाचा एक विभाग असला तरी तो विद्यापीठाच्या आवारात नसून फर्गसन रस्त्यावर आहे आणि या विभागाचं एक स्वतंत्र अस्तित्व आहे. या विभागाने पत्रकारितेला अनेक चांगले चेहरे दिले असून राज्यातच नव्हे तर देशभरातील निवडक पत्रकारितेच्या इन्स्टिट्यूट्समध्ये या विभागाचं नाव घेतलं जातं.

दरम्यान, पुणे विद्यापीठानं नुकतंच एक परिपत्रक काढून हा विभाग पुणे विद्यापीठात हलवणार असल्याचं तसेच मीडिया अँड कम्युनिकेशन स्टडीजमध्ये विलीनीकरण करणार असल्याचं जाहीर केलं आहे. विद्यापीठाच्या निर्णयाला पत्रकार तसेच माजी विद्यार्थ्यांचा जोरदार विरोध होत आहे. याविरोधात माजी विद्यार्थ्यांनी तयार केलेली कृती समिती आज(सोमवार) दुपारी कुलगुरुंची भेट घेणार असून निवेदन देणार आहे.

दुसरीकडे हा विभाग विद्यापीठात हलवून विभागाची जमीन खासगी बिल्डरांच्या घश्यात घालण्याचा डाव असल्याचा आरोप केला जात आहे.

थोडक्यात बातम्या-

रोख व्यवहार करणाऱ्यांनो वेळीच व्हा सावधान; 10 व्यवहार केल्यानंतर….

भारत रशिया पंतप्रधानांची आज भेट; मोदी-पुतिन भेटीकडं जगाचं लक्ष

‘…तर सत्ताधारी मंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार’; इम्तियाज जलिल यांचा इशारा

लस घेतल्यानंतर तुम्ही ‘इतके’ दिवस सुरक्षित राहणार; एम्सच्या डाॅक्टरांनी दिली महत्वाची माहिती

काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्यानं केलं मोदी सरकारचं कौतुक; काँग्रेस नेत्यांच्या भुवया उंचावल्या

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More