महाराष्ट्र मुंबई

सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस यापुढे सावित्रीबाई फुले महिला शिक्षण दिन म्हणून करणार साजरा!

मुंबई | क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा तीन जानेवारी हा जन्मदिवस हा राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये सावित्रीबाई फुले महिला शिक्षण दिन म्हणून साजरा केला जाईल अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

स्त्री शिक्षणातील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे योगदान आणि त्यांचे कार्य समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचविणे गरजेचे असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. आज याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला.

या दिवशी शाळांमध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित भाषणे, निबंध, वक्तृत्व, परिसंवाद व एकांकिकांचे आयोजन करण्यात येईल. त्याचप्रमाणे, सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयांत, शाळेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येईल.

सावित्रीबाई फुले यांच्या नावाने स्त्री शिक्षणात कार्यरत शिक्षिका, अधिकारी, सामाजिक कार्यकर्त्या यांना पुरस्कार देण्यात येईल, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.

थोडक्यात बातम्या-

भाजप कार्यकर्त्यांवर पुन्हा हल्ला; व्हीडिओ शेअर करत कैलास विजयवर्गीय यांनी मततादीदींना सुनावलं

‘आता लव्ह लेटर पाठवू नका’; शेतकऱ्यांनी मोदी सरकारला सुनावलं

पंकजा मुंडेंच्या ताब्यातील वैद्यनाथ साखर कारखान्यात चोरी; ‘इतक्या’ लाखांचं साहित्य लंपास

नाशिकमध्ये कोरोनामुळे 3 महिन्याच्या बाळाचा मृत्यू!

“कोरोनाचा नवा अवतार अधिक संसर्गजन्य, आता जास्त काळजी घ्यावी लागेल”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या