बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मी जेलमध्ये असताना ‘त्यांनी’ माझा जीव वाचवला – छगन भुजबळ

जळगाव | राज्यातील ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी जळगावमध्ये ओबीसी हक्क परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमात छगन भुजबळांनी जोरदार फटकेबाजी केली आहे. केंद्र सरकारने राज्यातील ओबीसीचें राजकीय आरक्षण का काढले ते सांगा आणि त्याची भरपाई कशी करणार? असा सवाल केंद्र सरकारला केला आहे.

आम्हाला शरद पवारांनी मंडल आयोगाची स्थापना करून आरक्षण दिलंय, देशात सर्वत्र आरक्षण होतं, पण केंद्र सरकारने 102 वी घटनादुरूस्ती करून राजकीय आरक्षण काढलं आहे. पुन्हा परत केंद्र सरकारने राज्यांना अधिकार दिले आहेत, पण तुम्ही आमचं आरक्षण का काढलं आहे, असा सवाल भुजबळांनी मोदी सरकारला केला आहे. तसेच मोदी सरकारकडून अंधश्रद्धेला खतपाणी घातलं जात आहे. फोडा आणि राज्य करा, असं मोदी सरकारचं धोरण आहे, असं भुजबळ म्हणाले आहेत.

मी जेलमध्ये असताना कपिल पाटलांनी माझा जीव वाचवला आहे. माझी तब्येत ठिक नसताना पाटलांनी मला खूप मदत केली आहे. पाटील विधीमंडळात उभे राहिले, तसेच आवाज देखील उठवला आहे. पाटील यांचा मी कधीही शब्द मोडू शकत नाही. मला कठीण काळात शरद पवारांनी देखील मदत केली आहे. त्यांनी पत्र पाठवल्यामुळेच मला उपचार मिळू शकले, असं भुजबळांनी सांगितलं आहे.

दरम्यान, मी कोणाच्या भावनेला हात घालणार नाही, पण दगडूशेठ गणपतीला 50 हजार की 25 हजार आमच्या भगिंनीनी अथर्वशीर्ष म्हटलं आहे. इथनूच जवळ सावित्रीबाई फुलेंनी महिलांसाठी शाळा सुरू केली. ती शाळा अगदी हाकेच्या अंतरावर आहे. अथर्वशीर्ष म्हणून झाल्यावर तिथं कोणालाही डोकं टेकावावं वाटलं नाही. सावित्रीबाईंनी वाचायला शिकवलं म्हणून तर तुम्ही अथर्वशीर्ष वाचू शकलात, असं भुजबळांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या –

“ठाकरे सरकार टक्केवारीच्या फुगड्या खेळतंय का?”

आम्हाला पुन्हा संधी मिळणार, कधी ते सत्तेत तर… – देवेंद्र फडणवीस

UPSC Result | मराठवाड्याच्या विनायक महामुनीने देशात मिळवला 95 वा क्रमांक

UPSC Result | शेतकरी बापाचे कष्ट फळाला आले; सोलापूरचे शुभम जाधव साहेब झाले

मुंबईतल्या शाळा सुरु होणार का?, महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More