बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पत्नीला आपल्या छोट्या भावासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं अन् पुढे झालं असं काही की…

रांची | झारखंडमधील रांची येथे काल एक हत्या झाली. याबाबतचा तपास केल्यानंतर अत्यंत धक्कादायक बाब समोर आली आहे. सख्या भावानेच आपल्या धाकट्या भावाचा खून केल्याचं समोर आलं. या घटनेनंतर संपुर्ण परिसरात एक खळबळ उडाली आहे. सर्वत्र एकच चर्चा रंगली असून परिवारात देखील सर्वांना धक्का बसला आहे.

संबंधित आरोपीचं नाव गोदाधर लोहारा असं आहे. तर मृत झालेल्या त्याच्या धाकट्या भावाचं नाव रामसिंग लोहारा असं आहे. गोदाधर याला आपल्या पत्नीचं आणि धाकट्या भावाचं अवैध संबंध असल्याचा संशय होता. यावरुण दोघा भावांमध्ये सतत वाद होत होता. अनेक वेळा गोदाधरने त्याच्या भावाला समजावलं देखील. मात्र काल रात्री गोदाधर याने आपल्या धाकट्या भावासोबत आपल्या पत्नीला रंगेहाथ पकडलं.

दरम्यान, पत्नी आणि धाकटा भाऊ आक्षेपार्ह अवस्थेत पाहून गोदाधर याचा राग अनावर झाला आणि त्याने जवळ असलेल्या लोखंडी रॉडने आपल्या धाकट्या भावाचा खून केला.

दरम्यान, या बाबत तपास केल्यानंतर आता पोलिसांनी गोदाधर याला अटक केली आहे. त्याची चौकशी चालू असून याबाबतचा अधिक तपास पोलीस करत आहेत. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी रिम्स येथे पाठविला आहे.

थोडक्यात बातम्या-

“कोरोना रुग्णसंख्या वाढली की जनता बेजबाबदार, कमी झाली की सरकारचं यश”

टाॅमीला कुत्रा का म्हटलं?; कुत्र्याच्या नावावरून दोन कुटूंबात तुफान हाणामारी

कोरोनाचे नियम धाब्यावर, ‘या’ ठिकाणी मुस्लिम धर्मगुरुच्या अंत्ययात्रेसाठी तुफान गर्दी

पुण्यात लसीकरणाच्या नोंदणीत गोंधळ; तरूणांमध्ये संतापाचं वातावरण

मोबाईल इंटरनेट शिवाय Whatsapp वापरता येणार; वाचा कसं

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More