“बीचवर 70 लोकांसमोर…”, ‘या’ अभिनेत्रीच्या खुलाशाने बाॅलिवूड हादरलं!

Sayani Gupta | अभिनेत्री सयानी गुप्ता कायम तिने केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत असते. सयानी सोशल मीडियावर कायम सक्रीय असते. आपल्या चाहत्यांसाठी ती नेहमी नवनवीन फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. दरम्यान, सयानी पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. शूटिंगबद्दलचा आपल्यासोबतचा वाईट अनुभव सयानीने शेअर केला आहे. सध्या सगळीकडे सयानीने केलेल्या या भाष्याची चर्चा रंगली आहे.

काय म्हणाली सयानी?

एका मुलाखतीमध्ये बोलत असताना सयानी (sayani gupta) म्हणाली की, मी इंटीमसीवर पुस्तक लिहू शकते. आनंद या गोष्टीचा आहे की, भारतात आता इंटीमसी कॉर्डिनेटर प्रोफेशनचा भाग बनलाय. मात्र, इंटीमेट सीन्स करणं सोपं असतं. कारण ते टेक्निकल असतात. पण काही लोक याचा फायदा उचलतात. मी स्वत: या स्थितीचा सामना केलाय. डायरेक्टर कट बोलल्यानंतरही अभिनेत्याने किस बंद केलं नाही, हे असं वागणं अशोभनीय आहे. तुम्ही अनकंफर्टेबल होता.”

बीचवर झोपायचं होतं-

सयानीने (sayani gupta) फोर मोर शॉट्सच्या गोव्यामध्ये शूट झालेल्या आऊटडोर शूटचा उल्लेख केला. त्यात तिला छोटा ड्रेस घालून बीचवर झोपायचं होतं. माझ्यासमोर 70 लोक उभे होते. मला शॉल देईल असा सेटवर एक व्यक्ती नव्हता. कोणीही माझ्यासोबत नव्हतं, असं ती म्हणाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sayani G (@sayanigupta)

पुढे ती म्हणाली की, तेव्हा मला खूप असुरक्षित वाटत होतं, कारण माझ्याजवळ 70 माणसं होती. पण स्टाफ पैकी कोणीही नव्हतं, असंही सयानी म्हणाली.

दरम्यान, सयानी गुप्ताच्या वर्क फ्रंटबद्दल सांगायचं झाल्यास तिने ‘आर्टिकल 15’, ‘जॉली एलएलबी 2’, ‘जग्गा जासूस’, ‘फॅन’, ‘कॉल मी बे’, ‘फोर मोअर शॉट्स प्लिज’, ‘पगलेट’, ‘बार बार देखो’ यांसारख्या सिनेमा आणि वेब सीरिजमध्ये भूमिका साकारल्या आहेत.

News Title : sayani gupta talks about intimate scene

महत्त्वाच्या बातम्या-

बारावी पास तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी!

मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कधी? दीपक केसरकरांनी तारीख सांगितली

प्रधानमंत्री जन आरोग्य योजना काय आहे? अशाप्रकारे करा नोंदणी

क्रिकेट विश्वात शोककळा पसरली, क्रिकेटपटूचा मैदानातच मृत्यू

उपमुख्यमंत्री व्हा नाहीतर…; शिंदेंसमोर दिल्लीत भाजपाने ठेवल्या ‘या’ 2 मोठ्या ऑफर्स?