बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“दात पाडीन” म्हणत शिवसेना नेत्याची महिला पदाधिकाऱ्यावर आरेरावी

सिंधुदुर्ग | सिंधुदुर्गमध्ये सध्या जिल्हा बँक निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. मात्र, यादरम्यान भाजप आणि शिवसेनेमध्ये चांगलीचं जुंपल्याचं पहायला मिळत आहे. शिवसेनेचे (Shivsena) सतिश सावतं यांच्या नेतृत्वाखाली सहकार समृद्धी पॅनल तर भाजपचे (BJP) राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली सिद्धीविनायक पॅनल यांच्यात ही लढत होती.

सकाळपासून शातंतेत मतदान सुरु होते. यावेळी सतिश सावतं हे मतदान केंद्रावर मोबाईल वापरत आहेत, असा आरोप जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावतं यांनी केला होता. त्यानंतर सतिश सावतं आणि संजना सावतं यांच्यात तिथेचं खडाजंगी सुरू झाली. त्यानंतर हा वाद इतका वाढला की, सतिश सावतं यांनी दात पाडण्याची भाषा केली.

सतिश सावतं यांनी दात पाडीन, असं बोलल्याची तक्रार संजना यांनी पोलिसांकडे केली. त्यावेळी पोलिसांनी सतिश सावतं यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, सतिश सावतं यांनी पोलिसांसोबतही हुज्जत घातली.

दरम्यान, या काळात पोलीस आणि शिवसेेनेचे कार्यकर्ते मतदान केंद्रावरचं भिडले आहेत. शिवाय सतिश सावतं यांनी वापरलेल्या भाषेमुळेही एकचं खळबळ माजली. त्यामुळे सकाळपासून शातंतेत सुरु असलेल्या मतदानाला गालबोट लागल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे.

थोडक्यात बातम्या –

‘…त्यांनी काँग्रेस नेते राहूल गांधींचा पपलू केलाय’; किरीट सोमय्यांचा घणाघात

‘पुष्पा I Hate Beer’; पोलिसांची ‘ती’ पोस्ट तुफान व्हायरल

सोनं-चांदी दरात घसरण; वाचा आजचे ताजे दर

“…तर मला वाटतं मी माझा वेळ वाया घालवत आहे”, ‘या’ अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

राणे सगळ्यांना पुरुन उरणारे आहेत – चंद्रकांत पाटील

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More