बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘लव यू जिंदगी’ म्हणत ती धैर्यानं कोरोनाशी लढली, मात्र नियतीला काही वेगळंच हवं होतं!

नवी दिल्ली | जीवनामध्ये सकारात्मक विचार आणि इच्छाशक्ती असेल तर आपण कोणत्याही संकटावर मात करू शकतो, असं म्हटलं जातं. असाच सकारात्मक विचार आणि धैर्य असलेल्या एका मुलीचा व्हिडिओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. पण अखेर त्या मुलीवर काळाने झडप घातलीच.

डॉक्टर मोनिका लांगेह यांनी कोरोनावर उपचार घेत असलेल्या एका 30 वर्षीय मुलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. यामध्ये संबंधित मुलगी ‘लव यू जिंदगी’ या गाण्यावर बेडवरच बसून थिरकरताना पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी या मुलीचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करत डॉक्टरांनी तिचा सकारात्मक प्रतिसाद आणि विचार जगासमोर आणला होता.

दरम्यान, रेमडेसिविर इंजेक्शन तसेच प्लाज्मा थेरपी या मुलीला दिलेली आहे आणि ती सध्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये उपचार घेत आहे. तिच्या इच्छाशक्तीचं कौतुक देखील या डॉक्टरने केलं होतं. काही दिवसांपासून हा व्हिडिओ चांगलाच ट्रेंडिंगवर होता. अनेकांनी ती बरी व्हावी यासाठी प्रार्थना देखील केल्या. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं.

सर्व उपचार व्यवस्थित सुरू असताना आणि इच्छाशक्ती दृढ असताना देखील कोरोनाने या मुलीचा घात केला. आज सकाळी कोरोनाशी लढत असलेली ही लढाई ती मुलगी अखेर हरली. जरी त्या मुलीचा जीव गेला असेल तरीही तिने सर्वांना आनंदात आणि हसत खेळत जगावं कसं हा संदेश नक्कीच दिला. सोशल मीडियावर सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लव यू जिंदगी म्हणत अखेर या मुलीने रुग्णालयातच आपल्या शेवटच्या घटका मोजल्या.

पाहा व्हिडीओ –

थोडक्यात बातम्या –

‘या’ राज्यात पुन्हा मृत्यूचे थैमान! मध्यरात्री ऑक्सिजन संपला; 4 तासांत 13 रुग्णांचा मृत्यू

मराठा आरक्षणाबाबत खासदार संभाजीराजेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र; केली ‘ही’ महत्वाची मागणी

फेसबुकवरील मैत्रीनं घातला 2 लाखांचा गंडा; नंतर केलं ‘हे’ धक्कादायक कृत्य 

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर विठू-रखुमाई आणि श्रीमंत दगडूशेठ गणपतीला हापूस आंब्याची आरास

विधवेवर पोलिसाकडूनच बलात्कार, गावकऱ्यांनी असा शिकवला धडा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More