बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! 12वीचे मार्क वाढवून देतो म्हणत शिक्षकाची विद्यार्थीनीकडे शरीरसुखाची मागणी

पुणे | शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना पुण्यात घडली आहे. 11वी मध्ये शिकणाऱ्या मुलीला 12वी मध्ये मार्क वाढवून देतो असं सांगत शिक्षकाने शरीरसुखाची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. मुलीने या प्रकाराची माहिती आपल्या पालकांना सांगताच त्यांनी संबंधित शिक्षकाला चांगलाच धडा शिकवण्यात आला आहे.

12वीत मार्क वाढवून देतो, पैसे देतो फक्त तुला शारीरिक संबंध ठेवावे लागतील, अशी मागणी या शिक्षकाने केल्याचा आरोप मुलीच्या पालकांनी केलाय. पालकांनी संबंधित शिक्षकाला चांगलाच चोप दिला. तसंच त्याच्या तोंडाला काळंही फासलं.

संबंधित शिक्षकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. पुणे शहरात हा प्रकार घडल्यामुळे सर्व स्तरातून त्या शिक्षकाविरोधात संताप व्यक्त केला जातोय.

11वी मध्ये शिकत असलेल्या मुलीला 12वी ला मार्क वाढवून देतो व पैसे देतो फक्त तुला शारीरिक संबंध ठेवावे लागतील अशी शिक्षकाकडून विद्यार्थिनीला मागणी करण्याची संतापजनक व लज्जास्पद घटना पुण्यात घडली. असल्या घटनांच सत्र राज्यात सुरू आहे. जनता वाऱ्यावर आणि सत्ताधारी एकमेकांना सांभाळण्यात दंग आहेत, अशा शब्दात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सरकारवर निशाणा साधलाय.

थोडक्यात बातम्या- 

13 राज्यांतील सर्वेक्षणात ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नंबर 1’

“सत्तेवर येऊन सात वर्षे झाले पण महागाईचा राक्षस आणखी मारता आला नाही”

‘…तर दोन महिन्यात आरक्षण बहाल करून दाखवेल’; छगन भुजबळांचं फडणवीसांना ओपन चॅलेंज

भाजपने राम सातपुते यांच्यावर राष्ट्रीय पातळीवर सोपवली मोठी जबाबदारी!

नाना पटोले घेणार राज्यपाल कोश्यारींची भेट; हँगिंग गार्डनपासून सायकलने राजभवनावर जाणार

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More