Top News महाराष्ट्र मुंबई

‘ही तर ठाकरे सरकारची हुकूमशाही’ म्हणत भाजपचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

मुंबई | काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांकडून फेक टीआरपी घोटाळा उघड करण्यात आला होता. यासंदर्भात आता रिपब्लिक चॅनेलच्या सीईओंना अटक करण्यात आली. याच मुद्यावरुन भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

‘ही तर उद्धव बाळासाहेब ठाकरे सरकारची हुकूमशाही सुरू आहे’, अशी टीका अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरुन केली आहे.

‘कोणत्याही कागदपत्रांशिवाय रिपब्लिक मीडिया नेटवर्कचे सीईओ यांच्या घरी मुंबई पोलीस दाखल झाले आणि त्यांनी अटक केली. महाराष्ट्रात लोकशाही पूर्णपणे संपुष्टात आली आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे सरकारची हुकूमशाही सुरू आहे’, असं ट्विटमध्ये भातखळकर यांनी लिहीलं आहे.

दरम्यान, बॅरोमिटरमध्ये फेरफार करून टीआरपी आकडे वाढवण्यात येत असल्याचा प्रकार घडत असल्याचा प्रकार समोर आल्याने, याबाबत मुंबई पोलिसांनी 13 जणांवर कारवाई करून त्यांना अटक केलीये.

थोडक्यात बातम्या-

लालू प्रसाद यादव यांची प्रकृती बिघडली; रूग्णालयात उपचार सुरु

मुंबई ढगाळ वातावरणासह पावसाची रिमझिम; विदर्भ, कोकणाला पावसाचा इशारा

राजनाथ सिंह यांच्या भेटीनंतर हरियाणाच्या उपमुख्यमंत्र्यांचा आश्चर्यजनक दावा, म्हणाले…

‘लोकहो, शेतकरी मरत आहे!’,म्हणत संजय राऊतांनी केलं आवाहन

शुद्राला शुद्र म्हटलं, तर वाईट वाटतं; प्रज्ञा ठाकूर यांचं वादग्रस्त विधान

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या