महाराष्ट्र मुंबई

‘…तर देशातील राज्यं फुटतील’; संजय राऊतांचा मोदी सरकारवर निशाणा

मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. राऊत यांनी अनेक मुद्दे उपस्थित करत सामनातील ‘रोखठोक’मधून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

मुंबईची ‘मेट्रो’ राजकीय अहंकारासाठी अडवून ठेवली. राजकीय साठमारीत आपण जनतेचे नुकसान करतो याचे भान केंद्रातील सत्तेने ठेवले नाही तर रशियातील राज्ये फुटली तसे आपल्या देशात घडायला वेळ लागणार नाही, अशी भीती राऊत यांनी व्यक्त केली आहे.

मावळत्या वर्षात देशाने जे आघात सहन केले त्यांत कोरोनाचा हल्ला मोठा. लाखो लोकांनी प्राण गमावले. त्याहीपेक्षा भयंकर म्हणजे ‘संसद’ म्हणजे लोकशाहीचा आत्मा. तो आत्माच नष्ट झाला. शेतकऱ्य़ांचे आंदोलन ज्या तीन कृषी विधेयकांविरुद्ध सुरू आहे ती तीनही विधेयके बहुमताच्या जोरावर मंजूर करून घेतली गेली. आता त्या विधेयकांविरोधात शेतकरी आज रस्त्यावर उतरला आहे, असं राऊत म्हणाले.

राजकारणात फक्त स्वार्थ, कपटीपणा आणि शेवटी हिंसा इतकेच शिल्लक राहिले काय, असा प्रश्न पं. बंगालमधील सध्याचे वातावरण पाहून पडतो. लोकशाहीत राजकीय पराभव होतच असतात, पण ममता बॅनर्जी यांना सत्तेवरून घालविण्यासाठी केंद्रीय सत्ता ज्या पद्धतीने वापरली जात आहे ते धक्कादायक आहे, असंही राऊतांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

मुंबईतील फिनिक्स मॉलमध्ये भीषण आग, अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल

राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची प्रकाश आंबेडकरांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट!

…तर त्यांना 10 फूट खोल खड्यात पुरलं जाईल- शिवराज सिंह चौहान

 काँग्रेसला मोठा झटका; ‘या’ बड्या नेत्याची काँग्रेसला सोडचिठ्ठी

“वर्षभर आम्ही तुमचं ऐकलं, एक दिवस आमचं ऐका”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या