मुंबई | भारतीय जनता पक्षाचा बिहार निवडणूकीचा जाहीरनामा काल केंद्रीय मंत्री निर्मला सितारामन यांनी जाहीर केला. त्या जाहीरनाम्यावर राजकीय नेत्यांसह अनेकांनी सडकून टीका केली आहे. तसेच बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपनेही यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
अनुराग कश्पने आपल्या ट्विटर आकाऊंटवरुन एक ट्विट केले आहे. त्या ट्विटमध्ये त्यानी “वादा तेरा वादा” या गाण्याची व्हिडीओ लिंक पोस्ट करत मोदी सरकारवर उपरोधिक टोला लगावला आहे
अनुराग कश्यपचे हे ट्विट सोशल मीडीयावर चांगलेच व्हायरल होतं आहे. तसेच विरोधी पक्षांकडूनही या जाहीरनाम्यावरुन भाजप पक्षावर टिका केली जात आहे.
दरम्यान, भाजपने जाहीर केलेल्या जाहीरनाम्यामध्ये पहिलेच कलम हे बिराही जनतेला कोविड-19 प्रतिबंधक लस मोफत देणार असल्याचे नमूद केले आहे.
This song is just like the Vaccine https://t.co/FiwoCIlV2X
— Anurag Kashyap (@anuragkashyap72) October 22, 2020
महत्वाच्या बातम्या-
…तर त्या देशाला मोठी किंमत मोजावी लागेल- जो बायडेन
आज एकनाथ खडसेंचा जाहीररित्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश होणार!
मुंबई- सिटी सेंटर मॉलमध्ये अग्नितांडव, 11 तासांपासून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु
विनयभंगाच्या तक्रारीतून खडसे अजून सुटलेले नाहीत- अंजली दमानिया
पक्ष सोडण्याची वेळ का आली याचं खडसेंनी आत्मचिंतन करावं; गिरीश महाजनांचा टोला