बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘बाबा नको जाऊ दूर…’,वडिलांच्या निधनानंतर सायली संजीवची भावूक पोस्ट

मुंबई | मराठी अभिनेत्री सायली संजीवच्या (Sayali Sanjeev) वडिलांचं नुकतंच निधन झालं आहे. सायली संजीवच्या वडिलांचं 30 नोव्हेंबर रोजी निधन झालं होतं. स्वतः सायलीने इन्स्टाग्रामवर वडिलांसोबतचे फोटो शेअर करून ही बातमी दिली आहे. त्यावेळी तिने इंस्ट्राग्रामवर भावूक पोस्ट देखील लिहिली आहे.

तुला माहित आहे ना रे बाबा, माझं तुझ्यावर सगळ्यात जास्त प्रेम होतं. आधीही होतं आणि कायम असेल. या जगात सगळ्यात जास्त तूच होतास. तू आयुष्य आहेस माझं, अशी भावूक पोस्ट सायलीने केली आहे.

दैव होता तू, देव होता तू, खेळण्यातला माझा खेळ होता तू. शहाणी होते मी, वेडा होता तू, माझ्यासाठी कारे सारा खर्च केला तू. आज तू फेडूदे पांग हे मला, जगण्या रे मला अजूनही तूच हवा. बाबा, थांब ना रे तू, अशी आर्त हाक देखील सायलीने दिली आहे.

दरम्यान, बाबा दूर जाऊ नको, असंही सायली यावेळी म्हणाली आहे. सायलीच्या या पोस्टनंतर अनेक तिच्या चाहत्यांनी दिला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे.

पाहा पोस्ट-


थोडक्यात बातम्या-

Omicronचा धोका वाढला! द.आफ्रिकेतून आलेल्या महिलेने केलंं असं काही की…

“पुण्यात केवळ शनिवारवाडाच आहे का?”, अमोल कोल्हेंचं ट्विट चर्चेत

शिवसेनेची नेमकी भूमिका काय? तिसऱ्या आघाडीबाबत स्पष्टच सांगितलं…

PSI पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर; आता मुख्य परीक्षा ‘या’ तारखेला होणार

बुस्टर डोसची गरज आहे का?, असेल तर कोणती लस घ्यावी?; तज्ज्ञ म्हणतात…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More