बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…म्हणून मी भाजपत प्रवेश केला- सायना नेहवाल

नवी दिल्ली | भारताची बॅडमिंटनपटू सायना नेहवालने भाजपत प्रवेश केला आहे. बॅडमिंटनमध्ये भारताची मान उंचावणाऱ्या सायना नेहवालने भाजपत प्रवेश करत आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरूवात केली आहे.

सायना नेहवालसोबत तिच्या मोठ्या बहिणीनेही यावेळी भाजपत प्रवेश केला आहे. दिल्लीमध्ये भाजप कार्यालयात सायनाच्या पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.  भाजप देशासाठी चांगलं काम करत आहे. त्यामुळे मी भाजपत प्रवेश केला, अशी प्रतिक्रिया सायनाने दिली आहे.

कष्ट करणारे लोक मला आवडतात. नरेंद्र मोदी देशासाठी खूप मेहनत घेतात. नरेंद्र मोदींनी क्रिडा क्षेत्रासाठी खूप काम केलं आहे. त्यामुळे या पक्षाशी जोडलं जाणं हे मी माझं भाग्य समजते, असं सायना नेहवालने म्हटलं आहे.

दरम्यान, माझ्यासाठी हे सर्व नवं आहे. पण मला राजकारणाबद्दल वाचायला आवडतं. नरेंद्र मोदींकडून मला खूप काही शिकायला मिळतं. तसेच देशासाठी मी काहीतरी करण्याचा प्रयत्न करेन, असं सायनाने यावेळी सांगितलं.

ट्रेंडिंग बातम्या- 

फडणवीस सरकारने भीमा-कोरेगावचा हिंसाचार घडवून आणला; मलिकांचा खळबळजनक आरोप

शिस्तीत काम करा अन्यथा घरी जा; तुकाराम मुंडेंचा अधिकाऱ्यांना सज्जड दम

महत्वाच्या बातम्या- 

“देशद्रोह्यांना बिर्याणी नाही, तर गोळ्या घातल्या पाहिजेत”

मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीला

‘फुलराणी’ने घेतलं ‘कमळ’ हाती; दिल्ली विधानसभेचा करणार प्रचार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More