बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मालेगावचे एमआयएमचे आमदार म्हणतात; “माझ्या जीवाला धोका आहे”

नाशिक | मालेगावमधील एमआयएम पक्षाचे आमदार मौलाना मुफ्ती मो. ईस्माइल यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचं सांगितलं आहे. त्यानंतर मालेगावात एकच खळबळ उडाली होती. शिष्टमंडळासह अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रकांत खांडवी यांची भेट घेऊन मौलाना मुफ्ती ईस्माइल यांनी ही तक्रार केल्याची माहिती समोर येत आहे.

मालेगावचे माजी नगरसेवक रिजवान खान यांच्या घरावर काही दिवसांपूर्वी हल्ला झाला होता. या हल्ल्याप्रकरणी काँग्रेसचे माजी आमदार रशीद शेख यांच्या भावावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. रिजवान खान यांच्या हल्ल्याप्रकरणी निष्पक्ष चौकशीची मागणी करत मौलाना मुफ्ती मो. ईस्माइल यांनी माझ्या जीवाला धोका असल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.

आगामी काळात मालेगाव महापालिकेची निवडणुका होणार आहे. त्यावरुन मालेगाव येथीलं नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. माजी आमदार रशीद शेख हे काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत तर मौलाना मुफ्ती मो. ईस्माइल एमआयएमचे आमदार आहेत. आगामी निवडणुकीत या दोन्ही नेत्यांचं तिकिट पक्क असल्यानं आता राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे.

दरम्यान, रिजवान खान यांच्या घरावरील गोळीबार प्रकरणावरून या दोन्ही नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. गोळीबार प्रकरणाच्या पाठीमागे राजकीय विरोधक असल्याचा आरोप मौलाना मुफ्ती मो. ईस्माइल यांनी केला. त्यानंतर त्यांनी अप्रत्यक्षरित्या काँग्रेस मालेगाव येथील नेत्यांवर निशाणा देखील साधला होता.

थोडक्यात बातम्या-

जगाने जरी स्वातंत्र्य दिलं तरीही महिलांना बुरखा घालून….; तालिबान्यांच्या त्या निर्णयावरून यु-टर्न

“इच्छुकांनो हे लक्षात ठेवा”; मनसेच्या वसंत मोरेंनी सांगितली मोठी गंमत

पक्षाकडून बंदी मात्र ‘राष्ट्रवादी युवक’कडून गर्दीच्या कार्यक्रमांचा धडाका सुरु

“काँग्रेसच्या माडीला पवारांचा टेकू”; दानवेंनी उडवली बाळासाहेब थोरातांची खिल्ली

मनोहर भोसले प्रकरणात नवी घडामोड, ‘त्या’ दोन जणांचा शोध सुरु!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More