SBI Bank | एसबीआय बँकेत (SBI Bank) शिक्षित तरूण-तरूणींसाठी बँकेत काम करण्याची सुवर्णसंधी असणार आहे. यासाठी आता आपण लगेचच अर्ज करावा. या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. या प्रक्रियेसाठी कालपासून म्हणजेच 3 जुलैपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. 24 जुलै 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या अर्ज प्रक्रियेबाबत जाणून घेऊया.
एसबीआय बँकेत नोकरीची सुवर्णसंधी
ही भरती एसबीआयकडून (SBI Bank) राबवली जाते. एसबीआय बँकेत (SBI Bank) एक दोन नाहीतर तब्बल 16 पदांची भरती आहे. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी आहे. यासाठी व्यवस्थापक आणि उपव्यवस्थापक अशी पदे भरली जाणार आहेत. वयानुसार कामाचं पद अवलंबून असणार आहे. (SBI Bank)
या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाईन प्रक्रिया करावी लागणार आहे. यासाठी sbi.co.in/web/careers संकेत स्थळाला भेट द्या. तिथून संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल. तुम्ही ऑनलाईन पद्धतीने देखील अर्ज करू शकता. तिथेच तुम्हाला भरतीबाबत इतरही माहिती मिळू शकते. या प्रक्रियेसाठी उमेदवाराला 750 रूपये फि असणार आहे.
एसबीआयमध्ये तब्बल ‘एवढे’ वेतन
तसेच एससी एसटी उमेदवारांना भरतीसाठी फि भरावी लागत नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यासाठी आधी शॉर्ट लिस्टिंग होईल. तसेच मुलाखतीतून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. तसेच निवड झालेल्यांना 1 लाख 52 ते 64 हजारांपर्यंत वेतन मिळू शकते.
नोकरीच्या शोधार्थ असणाऱ्यांनी अर्ज करावा. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज दाखल करण्याआधी अर्जावरील अधिसूचना वाचून घ्याव्यात आणि मगच भरतीसाठी अर्ज करावा. आपण कोणत्या पदासाठी अर्ज दाखल करत आहोत याबाबतची माहिती मिळवावी.
News Title – SBI Bank In Job Opportunity News Update
महत्त्वाच्या बातम्या
दहावी पास तरुणांना थेट सरकारी नोकरीची संधी; वेळ वाया घालू नका, ‘इथे’ करा अर्ज
“परळीत वाल्मिक कराडांची दहशत, इथं धनुभाऊंचं काहीच चालत नाही”
पावसाबाबत हवामान खात्याचा मोठा अंदाज; ‘या’ भागात येलो अलर्ट जारी
लाडकी बहीण योजनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या, “निवडणुकीआधीचा जुमला..”
वसंत मोरे ठाकरेंच्या वाटेवर?, ‘मातोश्री’वर आज घेणार उद्धव ठाकरेंची भेट