बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

फरार विजय माल्याची मालमत्ता आता SBI विकू शकणार; माल्याकडे 14 हजार कोटींची थकबाकी

नवी दिल्ली | प्रसिद्ध फरार उद्योगपती विजय माल्या याला अनेक बँकांनी कर्ज दिले आहेत. मात्र या कर्जाची परत फेड करण्याआधीच विजय माल्या यानी भारतातून लंडनला पळ काढला. मात्र आता ब्रिटीश कोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर भारतातील बँकांना खुशखबर मिळाली आहे.

विजय माल्या याला कर्ज देण्यासाठी स्टेट बँकेच्या नेतृत्वाखाली 12 बँकांनी मिळून कन्साॅर्शियम स्थापन केलं होतं. यातूनच सर्वांनी मिळून विजय माल्याला  9 हजार कोटींचं कर्ज दिलं होतं. त्यानंतर विजय माल्या याने भारतातून पळ काढला आणि लंडनला स्थाईक झाले. मात्र विजय माल्याची संपत्ती विकण्याचा पर्याय कंन्साॅर्शियमकडे होता.

संपत्ती विकण्याचा पर्याय असला तरी विजय माल्या याच्या संपत्तीला सिक्यूरिटी कव्हर असल्यामुळे कन्साॅर्शियमला यामध्ये अडचण येत होती. या कारणामुळे कन्साॅर्शियमने ब्रिटीश कोर्टाकडे याचिका दाखल केली. याच्या निर्णयामध्ये कंन्साॅर्शियमच्या बाजूने निकाल लागला असून आता ते विजय माल्याची मालमत्ता विकून त्यांनी विजय माल्या याला दिलेल्या कर्जाचे पैसे वसूल करु शकतील.

दरम्यान, कन्साॅर्शियमने मिळून दिलेल्या 9 हजार कोटींचं कर्ज परतफेड न केल्यामुळे आता व्याजासह हा आकडा 14 हजार कोटींवर गेला आहे.

थोडक्यात बातम्या-

तौक्ते चक्रीवादळामुळे तब्बल 93 जण झाले बेपत्ता; युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू

नितीन गडकरींनी मोदी सरकारला दिला घरचा सल्ला, म्हणाले…

तुमचं SBI बँकेमध्ये काम आहे?, तर ही बातमी नक्की वाचा; बँकेने लागू केले नवीन नियम

लाॅकडाऊनमध्ये नोकरी गेल्यानंतर मुली लागल्या वेश्याव्यवसायाला, धक्कादायक प्रकार आला समोर

टुलकिट प्रकरणावरून केंद्रात भाजप-काँग्रेस आमनेसामने; वाचा काय आहे नेमकं प्रकरण

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More