आता कितीही वेळा काढा एटीएममधून पैसे; स्टेट बँकेच्या ग्राहकांसाठी खुशखबर

मुंबई | स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक आता एटीएम मधून कितीही वेळा पैसे काढू शकतात. बँकेने आता एटीएम मधून पैसे काढण्यावरील बंधने हटवली आहेत,पण ग्राहकांना काही नियमांचं पालन करावं लागणार आहे.

बँकेचे एटीएम कार्डधारक आता एटीएमवरुन अनलिमिटेड ट्रान्झॅक्शनचा लाभ घेऊ शकतात. त्यासाठी खातेदारांनी खात्यावर दरमहा सरासरी एक लाख रुपये शिल्लक ठेवणे आवश्यक आहे.

ग्राहकांना अनलिमिटेड ट्रान्झॅक्शन सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशा सूचना रिझर्व बँकेने स्टेट बँक ऑफ इंडियाला दिल्या होत्या.

दरम्यान, सध्या स्टेट बँकेच्या ग्राहकांवर दरमहा 8 वेळा एटीएम ट्रान्झॅक्शन करण्याची मर्यादा आहे.

महत्वाच्या बातम्या-

-कांदा विकून मोदींना पाठवली होती मनी आॅर्डर; त्याला मिळाला ‘हा’ प्रतिसाद

-माझं नशीब देशातील सव्वाशे कोटी जनतेच्या हातात- नरेंद्र मोदी

-दंगलीची माहिती असेल तर पोलिसांना द्या; शिवसेनेनं राज ठाकरेंची उडवली खिल्ली

-मीही शरद पवारांना भेटणार होतो- दीपक केसरकर

-राम मंदिरावरून धमक्या देणाऱ्या मसूद अजहरसारख्या दहशतवाद्यांचा खात्मा करू!