SBI Interest Hike l भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी कोट्यवधी ग्राहकांना मोठा धक्का देत कर्ज दरात (MCLR) वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेने वेगवेगळ्या कालावधीसाठी त्यांच्या MCLR मध्ये 10 बेस पॉइंट्सची वाढ जाहीर केली आहे. नवीन दर आजपासून म्हणजेच 15 ऑगस्ट 2024 पासून लागू झाले आहेत.
बँकेच्या नवीन MCLR बद्दल जाणून घ्या :
स्टेट बँक ऑफ इंडियाने लँडिंग दरांच्या ओव्हरनाइट मार्जिनल कॉस्टमध्ये 10 बेसिस पॉइंट्सने वाढ केली आहे आणि ती 8.10 टक्क्यांवरून 8.20 टक्के झाली आहे. तसेच एका महिन्याचा MCLR 8.35 टक्क्यांवरून 8.45 टक्के झाला आहे. तीन महिन्यांचा MCLR 8.40 टक्क्यांवरून 8.50 टक्के झाला आहे. तसेच सहा महिन्यांचा MCLR 8.75 टक्क्यांवरून 8.85 टक्के आणि एक वर्षाचा MCLR 8.85 टक्क्यांवरून 8.95 टक्के झाला आहे. दोन वर्षांचा MCLR 8.95 टक्क्यांवरून 9.05 टक्के आणि तीन वर्षांचा MCLR 9.00 टक्क्यांवरून 9.10 टक्के झाला आहे.
SBI व्यतिरिक्त, कॅनरा बँक, UCO बँक आणि बँक ऑफ बडोदा यांनी देखील अलीकडेच त्यांच्या किरकोळ खर्चाच्या कर्ज दरात वाढ केली आहे. कॅनरा बँकेने एमसीएलआरमध्ये 5 बेसिस पॉईंटची वाढ केली आहे. बँकेचे नवे दर 12 ऑगस्टपासून लागू झाले आहेत. याशिवाय युको बँकेने आपले व्याजदर बदलले असून नवे व्याजदर 10 ऑगस्टपासून लागू झाले आहेत. बँक ऑफ बडोदानेही व्याजदरात वाढ केली आहे.
SBI Interest Hike l जून 2024 नंतर MCLR तीनदा वाढला :
स्वस्त कर्जाची अपेक्षा करणाऱ्या करोडो ग्राहकांना SBI सतत धक्के देत आहे. बँकेने जून 2024 पासून एकूण तीन वेळा व्याजदरात वाढ केली आहे. गेल्या तीन महिन्यांत काही कालावधीसाठी व्याजदर 30 बेसिस पॉइंट्सपर्यंत वाढले आहेत. हे लक्षात घेण्यासारखे आहे की रिझर्व्ह बँकेच्या नुकत्याच झालेल्या एमपीसीच्या बैठकीत सलग 9व्यांदा रेपो दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट हे असे दर आहेत ज्यांच्या खाली बँक ग्राहकांना कर्ज देऊ शकत नाही. MCLR वाढवण्याच्या निर्णयानंतर गृहकर्ज, कार लोन, एज्युकेशन लोन अशी अनेक प्रकारची ग्राहकांची कर्जे महाग झाली आहेत.
News Title- SBI Home Loan Rate Hike
महत्वाच्या बातम्या-
सुप्रिया सुळेंच्या भाषणावेळी गोंधळ, मराठा आंदोलक आले, अन्…, नेमकं काय घडलं?
उन्हाचे चटके वाढले! राज्यात पाऊस पुन्हा कधी परतणार?, IMD कडून महत्वाची अपडेट
वातावरण तापलं! पुण्यात घडली धक्कादायक घटना
स्वातंत्र्यदिनी ‘हे’ ब्लॉकबस्टर चित्रपट पाहून आजचा खास दिवस करा साजरा!
बांग्लादेशातील हिंदुंबद्दल नरेंद्र मोदींचं मोठं वक्तव्य, म्हणाले…