बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जर ‘हे’ केलं नाहीतर बँकिग सेवेत येणार अडचण; SBI कडून ग्राहकांना अलर्ट

मुंबई | भारतात सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बॅंक म्हणून स्टेट बॅंक ऑफ इंडियाची ओळख आहे. त्यामुळे जगभरात तसेच भारतातही स्टेट बॅंक ऑफ इंडियाची ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अलिकडेच स्टेट बॅंक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे या बॅंकेच्या ग्राहकांना आपल्या खात्याबाबत काळजी लागली आहे.

स्टेट बॅंक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना 30 सप्टेंबरपूर्वी पॅन-आधार कार्ड लिंक करण्याची नोटीस पाठवली आहे. जर ग्राहकांनी बॅंकेला पॅन-आधार कार्ड लिंक केलं नाही तर त्या ग्राहकांना बॅंकेच्या सेवेत अडचणीला सामोरे जावं लागणार असल्याचं, बॅंकेने म्हटलं आहे. या संदर्भात बॅंकेने एक ट्विट केलं आहे.

आम्ही आमच्या ग्राहकांना सल्ला देतो की त्यांचे पॅन आधार कार्डशी लिंक करा. जेणेकरून ग्राहकांशी कोणतीही गैरसोय होऊ नये आणि अखंड बॅंकिंग सेवेचा आनंद तुम्ही घेऊ शकाल. त्यामुळे सगळ्या ग्राहकांनी आपले पॅनला जोडणे अनिवार्य आहे. पॅनला आधार कार्डची जोडण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर असणार आहे, असं बॅंकेने म्हटलं आहे.

दरम्यान, पॅन आधार कार्डला लिंक करण्यासाठी ग्राहकांसाठी दोन पर्याय देण्यात आले आहेत. एसएमएस आणि इनकम टॅक्सच्या वेबसाईटवर जाऊन लिंक करता येणार आहे. जर आपण एसएमएस द्वारे लिंक करत असेल तर UIDPAN 12 अंकी आधारकार्ड नंबर  आणि 10 अंकी पॅन क्रमांक 567678 किंवा 56161 या क्रमांकावर मेसेज करावा लागणार आहे.

थोडक्यात बातम्या-

…म्हणून गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी दिला राजीनामा, राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण!

साकीनाकाच्या घटनेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया म्हणाले…

‘या घटनेवर राजकारण करणं म्हणजे मृत्याच्या टाळूवरचं लोणी खाण्यासारखं’; संजय राऊत विरोधकांवर संतापले

तालिबानमुळे भारताच्या अडचणी वाढण्याची शक्यता- राजनाथ सिंह

राज्यातील ‘या’ बड्या नेत्यांबाबत बदनामीकारक पोस्ट शेअर केल्यामुळे तरुणावर तक्रार दाखल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More