देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेचा ग्राहकांना झटका!

SBI MCLR Rate | देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. बँकेकडून मार्जिनल कॉस्ट ऑफ फंडबेस्ड लेंडिंग रेट (MCLR) मध्ये वाढ करण्यात आली आहे.

या वाढीनंतर कर्ज घेणं महागणार आहे. तसंच कर्जाचा मासिक हप्ताही जास्त (SBI MCLR Rate)भरावा लागणार आहे. याचे नवे दर आज 15 जुलैपासूनच लागू झाले आहेत. MCLR वाढल्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाचा बेस लँडिंग रेट 8.10 टक्क्यांवरून 9 टक्के झाला आहे.

एमसीएलआर रेटमध्ये वाढ

15 दिवसांसाठी MCLR दर 8.10 टक्के झाला आहे. तर, 1 महिन्याचा MCLR दर 8.35 टक्के, 3 महिन्यांचा MCLR दर 8.40 टक्के, 6 महिन्यांचा MCLR दर 8.75 टक्के आणि 1 वर्षाचा MCLR दर 8.85 टक्के झाला आहे.

तसेच 1 वर्षासाठी हा दर 8.85 टक्के, 2 वर्षांसाठी आणि 3 वर्षांसाठी हा दर अनुक्रमे 8.95 टक्के आणि 9 टक्के इतका आहे. या नवीन नियमानुसार, तीन महीने, 6 महीने आणि 2 वर्षांच्या (SBI MCLR Rate) कर्जासाठी MCLR दर 0.10 टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे.

मागच्या महिन्यात 15 जूनरोजीच बँकेने वेगवेगळ्या कालावधीसाठी 10 बेसिस पॉईंट्स (0.1%) वाढ केली होती. त्यानंतर आज 15 जुलैरोजी पुन्हा एक महिन्यांनीच त्यात वाढ कण्यात आली आहे. याचा थेट परिणाम हा ग्राहकांवर झाला आहे.

एमसीएलआर म्हणजे नेमकं काय?

MCLR हा एक बेंचमार्क व्याज दर (SBI MCLR Rate) आहे, ज्यानुसार सर्व बँका त्यांच्या ग्राहकांना गृह कर्ज, वाहन कर्जासह विविध कर्जे देतात. बँका या व्याजदरापेक्षा कमी दराने(SBI MCLR Rate) कर्ज देत नाहीत. 2016 साली ही पद्धत सुरू झाली. बहुतेक किरकोळ कर्जे, गृहकर्जे आणि वाहन कर्जे MCLR दराशी जोडलेली असतात.

उदाहरण म्हणून पाहिल्यास, तुमचं 10 लाखांचं गृहकर्ज एका वर्षाच्या MCLR शी जोडलेल्या व्याजदरावर असेल. तर, त्याचा एमसीएलआर आतापर्यंत 8.75 टक्के होता. आता तो 8.85 टक्के झाला आहे. मात्र, भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही.

News Title-  SBI MCLR rate hiked

महत्त्वाच्या बातम्या –

“जिथे जातात तिथेच ते XXX खातात”; जरांगेंची पुन्हा एकदा भुजबळांवर सडकून टीका

“पदव्या घेऊन काय होणार नाही, पंक्चरचे दुकान टाका”; भाजप आमदाराचा विद्यार्थ्यांना अजब सल्ला

“आम्ही मंत्री, मुख्यमंत्री झालो म्हणजे तुमच्यापेक्षा..”; छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य

तब्बल 46 वर्षांनी जगन्नाथ मंदिराच्या खजिन्याचं कुलूप उघडलं; धन बघून थक्क व्हाल

छगन भुजबळ मोठी भूमिका घेण्याच्या तयारीत?, शरद पवारांनंतर राहुल गांधींनाही भेटणार?