SBI MCLR Rate l स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) कर्जधारकांना मोठा धक्का दिला आहे. SBI बँकेने निधी व आधारित कर्ज दर हा MCLR च्या खर्चात वाढ केली आहे. बँकेने म्हटले आहे की, MCLR 10 बेसिस पॉईंटने वाढवला आहे. MCLR वाढल्यानंतर आता कर्ज महाग होणार आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाने सलग तिसऱ्यांदा MCLR दर वाढवले आहेत.
RBI बँकेने रेपो दरात बदल केला नाही :
नुकतीच RBI च्या चलनविषयक धोरण समितीची बैठक झाली आहे. रेपो दरात तब्बल नऊ वेळा कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. RBI ने सलग नवव्यांदा रेपो दर 6.5 टक्के ठेवल्यानंतर SBI ने व्याजदरात वाढ केली आहे. बँकेने MCLR वाढल्याने बँकेकडून कर्ज घेणे महाग होणार आहे. त्यामुळे आता तुम्हाला कर्ज घेताना पूर्वीपेक्षा जास्त ईएमआय भरावा लागेल. SBI च्या या निर्णयामुळे त्याचा थेट परिणाम ग्राहकांच्या खिशावर होणार आहे.
तसेच निधीवर आधारित कर्ज दराची सीमांत किंमत म्हणजेच MCLR हा एक बेंचमार्क व्याज दर आहे, ज्यानुसार सर्व बँका त्यांच्या ग्राहकांना गृह कर्ज, वाहन कर्जासह अनेक कर्जे देतात. बँका या व्याजदरापेक्षा कमी कर्जाला परवानगी देत नाहीत.
SBI MCLR Rate l MCLR नवीन दर काय आहेत? :
– तीन वर्षांसाठी MCLR दर 9 टक्क्यांवरून 9.10 टक्के करण्यात आला आहे.
– दोन वर्षांसाठी MCLR दर 8.95 टक्क्यांवरून 9.05 टक्के करण्यात आला आहे.
– – एका महिन्यासाठी MCLR दर 8.35 टक्क्यांवरून 8.45 टक्के करण्यात आला आहे.
– तीन महिन्यांसाठी MCLR दर 8.40 टक्क्यांवरून 8.50 टक्के करण्यात आला आहे.
– सहा महिन्यांसाठी MCLR दर 8.85 टक्के झाला, जो 8.75 टक्के करण्यात आला आहे.
– रात्रीच्या कालावधीसाठी MCLR दर 8.20 टक्के झाला, जो 8.10 टक्के करण्यात आला आहे.
News Title- SBI MCLR Rate Hike
महत्वाच्या बातम्या-
वाहतूक पोलिसांचं प्रसंगावधान अन् महिलेचा वाचला जीव; पाहा अटल सेतूवरचा थरारक Video
देशात रेल्वे अपघाताचं सत्र सुरूच, साबरमती एक्स्प्रेसचे 12 डब्बे रुळावरून घसरले अन्…
तब्बल 1 महिन्यांनी इंधनदरात घसरण?; जाणून घ्या आजच्या पेट्रोल-डिझेलच्या किमती
कुंभ, मकर, मीनसह ‘या’ राशीवर राहील शनीदेवाची कृपा, भाग्य उजळणार!
महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक कधी?; मुख्य निवडणूक आयुक्तांनी अखेर सांगितलं