Top News देश

…तर एटीएममधून पैसे काढताना ओटीपीची आवश्यकता, SBI चा नवा नियम

नवी दिल्ली | स्टेट बँकेने एक मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दहा हजारांपेक्षा जास्त रक्कम एटीएमधून काढण्यासंदर्भात स्टेट बँकेने हा निर्णय घेतला आहे. येत्या 18 सप्टेंबरपासून हा निर्णय लागू करण्यात येणार आहे.

स्टेट बँकेने घेतलेल्या निर्णयानुसार, जर तुम्हाला एटीएममधून 10 हजारांची रक्कम काढायची असल्यास तुम्हाला ओटीपीची आवश्यकता भासणार आहे. यासंदर्भात स्टेट बँकेने रिलीजही जारी केलं आहे.

सध्या रात्री 8 ते सकाळी 8 या वेळेत हा नियम लागू आहे. मात्र आता सुरक्षेच्या दृष्टीने विचार करता बँकेने संपूर्ण दिवसभरासाठी हा नियम कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यानच्या काळात फसवणुकीच्या अनेक घटना समोर आल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर स्टेट बँकेने हा निर्णय घेतला आहे.

बँकेच्या निर्णयाप्रमाणे आता ही ओटीपीची सेवा 24 तास सुरु राहणार आहे. म्हणजेच पैसे काढणाऱ्या व्यक्तीला आता एटीएमच्या पीनसह ओटीपी नंबरही टाकावा लागणार आहे. यासाठी बँकेने ग्राहकांना त्वरित मोबाईल क्रमांक अपडेट करण्यास सांगितला आहे.

महत्वाच्या बातम्या-

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी- नवनीत राणा

एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं; 30 जणांसह बोट नदीत बुडाली

“आरक्षणाबाबत लवकर निर्णय घेऊन मराठा समाजाला न्याय द्यावा, अन्यथा….”

…ही असंवेदनशीलता भयावह आहे; मोदी सरकारवर सुप्रिया सुळे संतापल्या!

मराठा क्रांती मोर्चा आक्रमक, आंदोलनाच्या तारखा केल्या जाहीर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या