बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

SBI ने शेतकऱ्यांसाठी आणली नवी योजना; होणार ‘हा’ मोठा फायदा, वाचा सविस्तर

नवी दिल्ली | स्टेट बँक ऑफ इंडीया म्हणजेच SBI ने शेतकऱ्यांसाठी एक विशेष योजना लाँच केली आहे. ज्या शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर घेण्याचा विचार चालू आहे अशा शेतकऱ्यांसाठी ही योजना उपयुक्त ठरणार आहे. तात्काळ ट्रॅक्टर लोन असं या योजनेचं नाव आहे. या योजनेअंतर्गत एसबीआय शेतकऱ्यांना ट्रॅक्टर घेण्यासाठी ट्रॅक्टरच्या किमतीच्या 100 टक्के कर्ज देणार आहे. मात्र त्यासाठी एसबीआयने काही अटी घालून दिल्या आहेत.

एसबीआयच्या या ट्रॅक्टर कर्जासाठी सर्व शेतकरी अर्ज करू शकतात. मात्र त्यासाठी त्या शेतकऱ्यांकडे किमान 2 एकर शेती असणे आवश्यक आहे. शिवाय एसबीआयने कर्जामध्ये नमूद केलेले नातेवाईकच यासाठी सहअर्जदार बनू शकतात. कर्ज मिळवण्यासाठी त्या शेतकऱ्याला ओळखीचा आणि पत्त्याचा पुरावा म्हणून काही कागदपत्रे द्यावे लागतील. पॅन कार्ड, पासपोर्ट, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणतेही एक ओळखपत्र चालणार आहे.

विशेष म्हणजे या योजनेअंतर्गत तुम्हाला ट्रॅक्टरचा विमा शुल्क आणि ट्रॅक्टरची जी काही किंमत असेल त्याचे पूर्ण पैसे कर्जात दिले जातील. मात्र ट्रॅक्टरसाठी लागणाऱ्या अतिरिक्त साधनांचा खर्च या कर्जात दिला जाणार नाही. शिवाय सुरुवातीला तुम्हाला ट्रॅक्टर घेताना इनिशियल फी म्हणून ट्रॅक्टरच्या किंमतीच्या 0.50 टक्के प्रोसेसिंग फी भरावी लागणार आहे. याशिवाय जर शेतकऱ्याला कर्ज घेतलेली रक्कम 4 ते 5 वर्षात लगेच भरायची असेल तर तोही पर्याय बँकेने दिला आहे.

मात्र कर्ज देण्यापूर्वी बँक तुमच्या जमिनीची खात्री करून घेणार आहे. ती जमीन लागवडीयोग्य असणं आवश्यक आहे. त्यासाठी लागवडयोग्य जमिनीचा पुरावा सादर करावा लागणार आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचा यावर्षी ट्रॅक्टर घेण्याचा प्लॅन होता. मात्र तो केवळ पैशांच्या अडचणीमुळे लांबत चालला होता. तर एसबीआयने लाँन्च केलेली योजना अशा शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधीच ठरणार आहे.

 

थोडक्यात बातम्या-.

वानखेडे आणि कंबोज यांची भेट तर…; नवाब मलिकांचा नवा गौप्यस्फोट

एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंवर मुंबई पोलिसांची पाळत?; व्हिडीओ पुराव्यासहीत वानखेडेंची तक्रार

कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्यांसाठी WHOचा महत्त्वाचा सल्ला, म्हणाले…

आमदार रवी राणांच्या अडचणी वाढल्या; आमदारकी धोक्यात?

‘मुंबई क्रुझ प्रकरण पुर्णपणे खोटं, शाहरूख खान त्यांच्या निशाण्यावर’; शत्रुघ्न सिन्हा संतापले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More