SBI बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, पगारही मिळणार भरभक्कम; ‘इथे’ करा अर्ज! 

SBI Recruitment 2024 new update

SBI Recruitment | सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. एसबीआय बँकेमध्ये मोठ्या प्रमाणात भरती होणार आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. त्यामुळे इच्छुकांनी जराही वेळेचा विलंब न करता लगेच अर्ज भरण्यास सुरुवात करावी. ही भरती कोणत्या पदांसाठी होणार आहे, तसेच यासाठी वयाची आणि शिक्षणाची अट काय असणार, याबाबत जाणून घेऊयात. (SBI Recruitment) 

स्टेट बँक ऑफ इंडियाकडून स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसर पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार sbi.co.in स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात.

ही भरती प्रक्रिया अभियांत्रिकी आणि संबंधित क्षेत्रातील पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी असून इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात. 22 नोव्हेंबर 2024 पासून या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या 12 डिसेंबर 2024 पर्यंत इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतात. 12  डिसेंबर ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. (SBI Recruitment)

‘या’ पदांसाठी होणार भरती-

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या भरतीमध्ये सहाय्यक व्यवस्थापक अभियंत्यासह इतर अनेक पदांवर नियुक्त्या केल्या जाणार आहेत. या पदांसाठी उमेदवारांना संबंधित क्षेत्रातील कौशल्य आणि अनुभव असणे आवश्यक आहे. बँकिंग क्षेत्रात नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी ही मोठी संधी असणार आहे. (SBI Recruitment)

पात्रता आणि वयोमर्यादा

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवाराकडे संबंधित ट्रेडमधील अभियांत्रिकी पदवी असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित क्षेत्रातील अनुभव असणे ही गरजेचे आहे. तसेच इच्छुक उमेदवाराचे किमान वय 21 वर्षे आणि कमाल वय 30 वर्षे असावे. निवड झालेल्या उमेदवारांना 48,480 ते 85,920 रुपये मासिक वेतन दिले जाईल. याशिवाय अतिरिक्त भत्ते आणि लाभही बँकेकडून देण्यात येतील. (SBI Recruitment)

News Title – SBI Recruitment 2024 new update

महत्वाच्या बातम्या : 

विधीमंडळ गटनेतेपदी निवड होताच देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

अखेर ठरलंं! भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत सर्वात मोठा निर्णय

आता केवळ ‘या’ पात्र महिलांनाच मिळणार लाडक्या बहिण योजनेचा लाभ; काय आहेत अटी?

महायुतीच्या शपथविधीसाठी उद्धव-राज ठाकरेंसह शरद पवारांनाही आमंत्रण; कोण-कोण लावणार हजेरी?

महायुतीत कुणाला किती मंत्रीपदं मिळणार?, सर्वात मोठी अपडेट समोर

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .