SBI बँकेत बंपर भरती; शैक्षणिक पात्रता ते पगार, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स

SBI Recruitment 2024 new

SBI Recruitment | बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या युवकांसाठी मोठी संधी निर्माण झाली आहे. एसबीआय बँकेत ज्युनियर एसोसिएट (कस्टमर सपोर्ट एंड सेल्स) च्या पदांसाठी बंपर भरती काढण्यात आली आहे. यासाठीचे अर्ज मागवण्यात आले आहेत. या भरतीबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात. (SBI Recruitment)

अर्ज करण्याची तारीख-

17 डिसेंबर 2024 पासून एसबीआय भरतीसाठीचे अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. याची अंतिम तारीख ही 7 जानेवारी 2025 आहे. तसेच प्रिलियम परीक्षा फेब्रुवारी 2025 मध्ये होऊ शकते. तर, मुख्य परीक्षा ही मार्च-एप्रिल 2025 मध्ये होण्याची शक्यता आहे. (SBI Recruitment)

शैक्षणिक पात्रता काय?

एसबीआयमधील या पदांसाठी इच्छुक उमेदवारांकडे कुठल्याही शाखेतील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे. इंटीग्रेटेड डूअल डिग्री (आईडीडी) सर्टिफिकेट असणाऱ्या उमेदवारांनी 31 डिसेंबर 2024 च्या अगोदर आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केलेले असावे. (SBI Recruitment)

वयोमर्यादा काय?

इच्छुक उमेदवाराचे वय 1 एप्रिल 2024 रोजी 20 वर्षांपेक्षा कमी आणि 28 वर्षांपेक्षा जास्त नसावे. म्हणजेच उमेदवाराचा जन्म 2 एप्रिल 1996 च्या अगोदर आणि 1 एप्रिल 2004 च्या नंतर झालेला नसावा.

अर्जासाठीचे शुल्क-

या भरतीसाठी सर्वसामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांना 750 रुपये परीक्षा शुल्क भरावे लागणार आहेत. तर, , एससी/एसटी/पीडब्ल्यूबीडी/एक्सएस/डीएक्सएस प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज करताना शुल्कात सूट देण्यात आली आहे. शुल्क भरताना डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड/इंटरनेट बँकिंगचा वापर करावा लागणार आहे.इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी sbi.co.in वर भेट द्यावी. (SBI Recruitment)

News Title –  SBI Recruitment 2024 new
महत्त्वाच्या बातम्या-

लालकृष्ण आडवाणी यांच्यावर ICU त उपचार सुरू, हेल्थबद्दल मोठी अपडेट समोर

कोट्यवधी PF खातेदारांसाठी सर्वात मोठी गुड न्यूज!

अखेर ठरलं! ‘ही’ महत्वाची खाती भाजपाकडेच, अजितदादा आणि शिंदेंच्या वाट्याला काय?

अल्लू अर्जुनच्या चाहत्यांना धक्का, ‘पुष्पा’ पुन्हा जाणार तुरुंगात?

आज संकष्टी चतुर्थी, बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ!

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .