स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी; पगार ऐकून थक्क व्हाल, लगेच करा अर्ज

SBI Recruitment 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे जराही वेळ वाया न घालवता अर्ज करण्यास सुरुवात करावी. कारण, या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ही सुरू झाली आहे. त्यामुळे नोकरीच्या शोधात (SBI Recruitment 2024) असणाऱ्यांनी फटाफट अर्ज करावीत.

या भरती प्रक्रियेतून विविध पदे भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी अवघे काही तासच तुमच्याकडे शिल्लक आहेत. या भरती प्रक्रियेद्वारे तब्बल 1100 हून अधिक पदे ही भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही 24 जुलैपासून सुरू झाली आहे.

तर, अर्ज करण्याची शेवटची तारिख ही 14 ऑगस्ट 2024 आहे. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. यामुळे उमेदवारांकडे आता अवघे काही तासच शिल्लक आहेत. या भरतीचा युवकांनी फायदा घ्यावा. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे.

एकूण किती जागा भरल्या जाणार?

बँक व्हीपी वेल्थ रेग्युलरच्या 600 जागा
रिलेशनशिप मॅनेजर एआरएम रेग्युलरच्या 150 जागा
रिलेशनशिप मॅनेजर एआरएम बॅकलॉगच्या 123 जागा
व्हीपी वेल्थ बॅकलॉगच्या 43 जागा
इन्व्हेस्टमेंट एक्सपर्टच्या 30 जागा (SBI Recruitment 2024)
इन्व्हेस्टमेंट एक्सपर्टच्या 30 अशा विविध जागा या भरती प्रक्रियेतून भरल्या जाणार आहेत.

अर्ज शुल्क किती असणार?

या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना 750 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. इच्छुक उमेदवार अधिक माहितीसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन बघू शकता. इथे तुम्हाला सगळी माहिती प्राप्त होईल. (SBI Recruitment 2024)

News Title : SBI Recruitment 2024 Thousand Plus Vacancies

महत्वाच्या बातम्या-

आता बँकेत जाण्याची गरज संपली; SBI बँकेने ग्राहकांना दिली गुड न्यूज

LIC ची डिजी टर्म इन्शुरन्स योजना काय आहे? जाणून घ्या फायदे व पात्रता

स्टँडअप कॉमेडियन शो मधलं ‘ते’ वक्तव्य अन् आज मुनव्वरचा माफीनामा!

..अन् अमिताभ बच्चन यांनी थेट हाथच जोडले; नेमकं असं काय घडलं?

“.. म्हणून रेखा यांनी पुन्हा लग्न केलं नाही”; धक्कादायक खुलासा समोर