SBI Recruitment 2024 | तरुण वर्गाला बँकेत जॉब करण्याची सुवर्ण संधी निर्माण झाली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाकडून मेगा भरती केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची आज 27 जून शेवटची तारीख आहे. त्यामुळे क्षणाचाही विलंब न करता पटापट अर्ज भरायला सुरुवात करा.
विशेष म्हणजे पदवीधर उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेतून ट्रेड फायनान्स ऑफिसरच्या एकूण 150 जागा भरल्या जाणार आहेत.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जून 2024 म्हणजेच आज आहे. त्यामुळे ज्यांना बँकेत नोकरी करण्याची इच्छा आहे, त्यांनी लगेच अर्ज भरून टाकावा. या भरतीसाठी (SBI Recruitment 2024) शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये.
अर्ज कसा करणार?
मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी घेतलेले उमेदवार हे भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात.यासोबतच उमेदवाराकडे आयआयबीएफने दिलेले फॉरेक्समधील प्रमाणपत्र देखील असणे आवश्यक आहे.
23 ते 32 वयोगटापर्यंतचे उमेदवार भरतीसाठी अर्ज करू शकतात. भरती प्रक्रियेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची निवड करून त्यांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. अर्ज करण्यासाठी तुम्हाला अवघे 750 रुपये शुल्क भरावे लागतील.
इच्छुक उमेदवार स्टेट बँक ऑफ इंडियाच्या साईटवर जाऊन (SBI Recruitment 2024) भरतीसाठी अर्ज करू शकतात.तिथेच आपल्याला अर्ज करण्याबाबत सविस्तर माहिती मिळून जाईल.
News Title : SBI Recruitment 2024
महत्त्वाच्या बातम्या-
HDFC बँकेने ग्राहकांना दिला झटका; ‘या’ सेवेत होतोय मोठा बदल
सतर्क राहा! हवामान विभागाचा ‘या’ जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
उच्चांकी दरवाढीनंतर सोनं झालं स्वस्त; 10 ग्रॅमचे भाव फक्त..
सरकारकडून शेतकऱ्यांची थट्टा; 1 रुपयात पीक विम्याच्या नावाखाली मोठा घोटाळा समोर