SBI बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी; ‘इथे’ करा झटपट अर्ज

SBI Recruitment | तरुण वर्गाला बँकेत जॉब करण्याची सुवर्ण संधी निर्माण झाली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाकडून ही भरती केली जाणार आहे. वेगवेगळ्या पोस्टसाठी भारतीय स्टेट बँकेत भरती होणार आहे. याबाबत बँकेकडून एक निवेदन देखील जारी करण्यात आलं आहे. त्यामुळे वेळेचा व्यत्यय न करता लगेच (SBI Recruitment ) अर्ज भरण्यास सुरुवात करावी.

भारतीय स्टेट बँकेत ऑफिसर (Sportsperson) आणि क्लेरिकल (Sportsperson) या पदांसाठी भरती जाहीर करण्यात येत आहे. ऑफिसर पदांसाठी 17 जागा आणि क्लेरिकल पदांसाठी 51 जागांवर भरती होणार आहे.

या भरतीसाठी वयाची अट, अर्ज भरण्याची शेवटची तारीख तसेच निवड प्रक्रिया कशी होणार, याबाबत सगळी माहिती या लेखात दिली आहे. ती काळजीपूर्वक वाचून अर्ज भरावा.

ऑफिसर पद :

यासाठी शैक्षणिक पात्रता ही पदवी, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत प्रतिनिधित्व केलेलं असावं. यासाठी एकूण 17 जागा रिक्त आहेत. भरतीसाठी तुमची वयोमर्यादा ही 20 ते 30 वर्षे असावी. ऑनलाईन (SBI Recruitment ) अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 14 ऑगस्ट 2024 आहे. तुम्ही sbi.co.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन फॉर्म भरू शकता.

क्लेरिकल (Sportsperson) पद :

यासाठी कोणत्याही शाखेतील पदवी असावी. भरतीसाठी तुमची वयोमर्यादा ही 20 ते 30 वर्षे असावी. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 14 ऑगस्ट 2024 आहे. तुम्ही sbi.co.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन फॉर्म भरू शकता.

अर्ज कसा करणार?

भारतीय स्टेट बँकेत ऑफिसर आणि क्लेरिकल या पदांच्या भरतीसाठी अर्जप्रक्रिया ही सुरू झाली आहे. त्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2024 असणार आहे. या भरतीसाठी इच्छुक(SBI Recruitment ) उमेदवार हे बँकेच्या sbi.co.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज भरू शकतात.

News Title : SBI Recruitment News

महत्त्वाच्या बातम्या-

वरळीत पुन्हा हिट अँड रन; अत्तर व्यवसायिकाच्या गाडीने तरुणाला उडवले

राज्यात पावसाचा जोर ओसरला तरी धोका कायम; पुढचे 4 दिवस..

महादेवाच्या कृपेने ‘या’ राशीच्या व्यक्तींची सर्व कामे मार्गी लागतील!

अजित पवारांचा ‘हा’ आमदार शरद पवारांच्या सभेत, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

‘जय महाराष्ट्र, जय एकनाथ’; शपथविधीवेळी भावना गवळी यांची घोषणा