मुंबई | भारतातील सर्वात मोठी बँक SBI ने पुन्हा एकदा MCLR वाढवले आहे. नवीन दर 15 मे म्हणजेच रविवारपासून लागू झाले आहेत.
या महिन्यात बँकेने MCLR मध्ये केलेली ही दुसरी वाढ आहे. बँकेने प्रत्येक कार्यकाळासाठी 10 बेसिस पॉइंट्स म्हणजेच 0.10 टक्के वाढ केली आहे.
SBI चा रातोरात, एक महिना आणि तीन महिन्यांचा MCLR आता 6.75 टक्क्यांनी वाढून 6.85 टक्के झाला आहे. 6 महिन्यांसाठी MCLR 7.15 टक्के, एका वर्षासाठी 7.20 टक्के, 2 वर्षांसाठी 7.40 टक्के आणि तीन वर्षांसाठी 7.50 टक्के झाला आहे.
MCLR वाढल्याने, ग्राहकांनी घेतलेल्या कर्जाच्या मासिक EMI मध्ये वाढ होईल. तसेच, नवीन ग्राहकांसाठीही कर्ज महाग होईल. आरबीआयने रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकेकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
थोडक्यात बातम्या-
नोकरीऐवजी तुम्ही सुरू करू शकता ‘हा’ व्यवसाय, महिन्याला कमवाल लाखो रूपये
“माझ्या पाठीत खंजीर खुपसून तुम्ही मुख्यमंत्री झालात”
“बाबरी पाडायला गेलो तेव्हा माझं वजन 128 किलो होतं आता…”
“आमचे असे मुख्यमंत्री आहेत की, एकही भाषण विकासावर नाही”
काँग्रेस नेते राहुल गांधींची भाजपवर जोरदार टिका, म्हणाले….
Comments are closed.