SBI Update | SBI चा ग्राहकांना सर्वात मोठा झटका!

मुंबई | SBI ने ग्राहकांना मोठा झटका दिलाय. सर्व मुदत कर्जावरील व्याजात 0.25% वाढ केली आहे. नवीन दर 15 डिसेंबरपासून लागू होणार आहेत. यामुळे हप्ता 781 रुपयांनी वाढेल.

बँकेने म्हटलंय की, एक वर्षाचा मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) 8.05 वरून 8.30%, दोन वर्षांचा दर 8.25 वरून 8.50 आणि तीन वर्षांचा दर 8.35 वरून 8.60% पर्यंत वाढवला आहे.

यासह, त्यांने बेंचमार्क प्राइम लेंडिंग रेट (BPLR) 14.15 टक्के प्रतिवर्ष केला आहे. त्यामुळे गृहकर्ज, वाहन, वैयक्तिक यासह सर्व प्रकारची कर्जे महाग होणार आहेत.

CIBIL स्कोअर 800 किंवा त्याहून अधिक असलेल्यांना 8.90% दराने गृहकर्ज मिळेल. 750 ते 799 लोकांना 9% दराने कर्ज मिळेल तर 700 ते 750 लोकांना 9.10% दराने कर्ज मिळेल.

650 ते 699 CIBIL स्कोअरवर 9.20% व्याज मिळेल. अधिक हप्ते भरण्याऐवजी ग्राहकांनी कर्जाचा कालावधी कमी करण्याचा निर्णय घ्यावा, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. हे त्यांना दीर्घकाळ वाचवू शकतं.

दरम्यान, अॅक्सिस बँकेने आता दोन कोटींपेक्षा कमी मुदत ठेवींवरील व्याज सात टक्क्यांपर्यंत वाढवलं ​​आहे. नवीन दर 15 डिसेंबरपासून लागू होणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-