पुरुषांवर बलात्कार अशक्य, सुप्रीम कोर्टानं याचिका फेटाळली

नवी दिल्ली | पुरुषांवरही महिलांद्वारे बलात्कार होऊ शकतो, ही शक्यता कोर्टाने फेटाळून लावली आहे. सोबतच लिंगभेद न करता बलात्कारांच्या प्रकरणांची सुनावणी करण्याची याचिकाही कोर्टाने फेटाळून लावली.

एखाद्या पुरुषाने एखाद्या स्त्री विरोधात बलात्कारीच तक्रार केली तर ती ग्राह्य धरली जात नाही, कारण भारतीय दंड विधानमध्ये फक्त पुरुषच अशा प्रकारचं कृत्य करु शकतात, असं समाविष्ट आहे. यावर याचिकेद्वारे आक्षेप घेण्यात आला होता. 

बलात्कारासंदर्भातील कायदा महिलांच्या सुरक्षेसाठी बनला आहे. त्यात कोर्ट हस्तक्षेप करु शकत नाही. ही याचिका आम्हाला काल्पनिक वाटते. खरंच पुरुषांसाठी कायद्यात बदल करण्याची गरज असेल तर ते संसदेचं काम आहे, असं मुख्य न्यायाधीश दीपक मिश्रा यांनी म्हटलंय.